Translate

Friday, February 22, 2019

@ ज्ञानेश्वरी @अध्याय १ला अर्जुनविषादयोगः-ओवी क्र :- ४१ ते ६०

卐 ॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥* *卐*
  💎 *॥ ॐ श्रीगणेशाय नमः॥* 💎
 *अध्याय पहिला :- अर्जुनविषादयोगः*
  🌹 *ओवी क्रमांक :- ४१ ते ५०* 🌹
     

💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢
*हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे*
    *हरे राम हरे राम राम राम हरे हरे*
💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢
🍁 🌟 *~_卐_~* *श्री ज्ञानेश्वरी प्रारंभ* *~_卐_~* 🌟🍁


ना तरी नगरांतरीं वसिजे । तरी नागराचि होईजे ।
तैसें व्यासोक्तितेजें । धवळत सकळ ॥ ४१ ॥

कीं प्रथमवयसाकाळीं । लावण्याची नव्हाळी ।
प्रगटे जैसी आगळी । अंगनाअंगीं ॥ ४२ ॥

ना तरी उद्यानीं माधवी घडे । तेथ वनशोभेची खाणी उघडे ।
आदिलापासौनि अपाडें । जियापरी ॥ ४३ ॥

नानाघनीभूत सुवर्ण । जैसें न्याहाळितां साधारण ।
मग अलंकारीं बरवेपण । निवाडु दावी ॥ ४४ ॥

तैसें व्यासोक्ति अळंकारिलें । आवडे तें बरवेपण पातलें ।
तें जाणोनि काय आश्रयिलें । इतिहासीं ॥ ४५ ॥

नाना पुरतिये प्रतिष्ठेलागीं । सानीव धरूनि आंगीं ।
पुराणें आख्यानरूपें जगीं । भारता आलीं ॥ ४६ ॥

म्हणौनि महाभारतीं नाहीं । तें नोहेचि लोकीं तिहीं ।
येणें कारणें म्हणिपे पाहीं । व्यासोच्छिष्ट जगत्रय ॥ ४७ ॥

ऐसी जगीं सुरस कथा । जें जन्मभूमि परमार्था ।
मुनि सांगे नृपनाथा । जनमेजया ॥ ४८ ॥

जें अद्वितीय उत्तम । पवित्रैक निरुपम ।
परम मंगलधाम । अवधारिजो ॥ ४९ ॥

आतां भारतकमळपरागु । गीताख्यु प्रसंगु ।
जो संवादला श्रीरंगु । अर्जुनेंसीं ॥ ५० ॥

      🍁🍁 *मराठी अर्थ*🍁🍁


  *ज्याप्रमाणे*नगरात राहिल्यावर मानवास शहाणपण प्राप्त होते, त्या प्रमाणे व्यासांच्या सात्विक वाणीच्या तेजामुळे सर्व जग ज्ञानसंपन्न झाले. ।।४१।।

  तारुण्यात पदार्पण केल्यानंतर मुलीच्या अंगी सौंदर्याचा नवा बहर आलेला असतो आणि तो स्पष्टपणे दिसू लागतो.  ।।४२।।

  वसंत ऋतूचे आगमन झाले, की बागेतील वनशोभा पूर्वी पेक्षा अधिकच बहरून येते; जणू काही सौंदर्याची खाणच उघडते.  ।।४३।।

  लगडीच्या रुपात सोने पाहीले, तर त्याचे सौंदर्य सर्वसाधारण वाटते; परंतु त्या सोन्याच्या विविध कलाकुसरीचे दागिने बनविले, तर त्या सोन्याचे सौंदर्य विशेष रुपाने खुलून दिसते.  ।।४४।।

  महर्षी व्यासांच्या तेजस्वी बुद्धीतून प्रगटलेल्या विषयामध्ये सत्य, शिव आणि सुंदरतेचे दर्शन होते, हे पाहून जगातील अनेक इतिहासकारांनी महाभारताचा आश्रय केला आहे.  ।।४५।।

  आपणास मोठी प्रतिष्ठा लाभावी म्हणून स्वतःच्या अंगी नम्रता धरून सर्व पुराणे आख्यानरुपाने महाभारतात येऊन जगामध्ये प्रसिद्ध पावली.  ।।४६।।

  म्हणूनच महाभारतामध्ये जे नाही, ते तिन्ही लोकांमध्ये नाही. महर्षी व्यासांच्या नंतर त्रैलोक्यात जे भाष्यकार झाले, त्यांनी महाभारतातील सिद्धांताचा अभ्यास केला. 'व्यासोंच्छिष्ट जगतत्रय' असे म्हणतात.  ।।४७।।

  अशी ही जगात सुरस म्हणून प्रसिद्ध असलेली आणि परमार्थाची जन्मभूमी असलेली महाभारताची कथा आहे. ही कथा जनमेजय राजाला वैंशपायन ऋषींनी सांगितली.।।४८।।

  श्रोते हो ! ही कथा एकाग्रतेने श्रवण करा. हे महाभारत अद्वितीय,उत्तम,अतिपवित्र निरुपम आणि सर्व मांगल्याचे परम स्थान आहे.  ।।४९।।

  महाभारत हे जणू काही कमळ असून भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनास सुखसंवादाच्या रुपाने सांगितलेली गीता जणू काही त्यातील सुगंधी पराग आहे.  ।।५०।।


*हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे*
    *हरे राम हरे राम राम राम हरे हरे*

💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢
*"वसुदेव सुतं देवं कंस चाणुर मर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगदगुरुम्।।"*
💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢

     💠🌹 *राम कृष्ण हरी* 🌹 💠

🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
卐 ॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥* *卐*
  💎 *॥ ॐ श्रीगणेशाय नमः॥* 💎
 *अध्याय पहिला :- अर्जुनविषादयोगः*
  🌹 *ओवी क्रमांक :- ५१ ते ६०* 🌹
   

💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢
*हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे*
    *हरे राम हरे राम राम राम हरे हरे*
💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢
🍁 🌟 *~_卐_~* *श्री ज्ञानेश्वरी प्रारंभ* *~_卐_~* 🌟🍁


*ना तरी शदब्रह्माब्धि । मथियला व्यासबुद्धि ।*
*निवडिलें निरवधि । नवनीत हें ॥ ५१ ॥*

मग ज्ञानाग्निसंपर्कें । कडसिलेंनि विवेकें ।
पद आलें परिपाकें । आमोदासी ॥ ५२ ॥

जें अपेक्षिजे विरक्तीं । सदा अनुभविजे संतीं ।
सोहंभावें पारंगतीं । रमिजे जेथ ॥ ५३ ॥

जें आकर्णिजें भक्तीं । जें आदिवंद्य त्रिजगतीं ।
तें भीष्मपर्वीं संगती । म्हणितली कथा ॥ ५४ ॥

जें भगवद्गीता म्हणिजे । जें ब्रह्मेशांनीं प्रशंसिजे ।
जें सनकादिकीं सेविजे । आदरेंसीं ॥ ५५ ॥

जैसें शारदीचिये चंद्रकळे । माजि अमृतकण कोंवळे ।
ते वेंचिती मनें मवाळें । चकोरतलगें ॥ ५६ ॥

तियापरी श्रोतां । अनुभवावी हे कथा ।
अतिहळुवारपण चित्ता । आणूनियां ॥ ५७ ॥

हें शब्देंवीण संवादिजे । इंद्रियां नेणतां भोगिजे ।
बोलाआधि झोंबिजे । प्रमेयासी ॥ ५८ ॥

जैसे भ्रमर परागु नेती । परी कमळदळें नेणती ।
तैसी परी आहे सेविती । ग्रंथीं इये ॥ ५९ ॥

कां आपुला ठावो न सांडितां । आलिंगिजे चंद्रु प्रकटतां ।
हा अनुरागु भोगितां । कुमुदिनी जाणे ॥ ६० ॥
     
       🍁 *मराठी अर्थ*🍁

     महर्षी व्यासांनी आपल्या प्रखर बुध्दीने वेदरूपी समुद्राचे मंथन करून महाभारतरूपी अनुपमेय नवनीत काढले.  ।।५१।।

  मग ते नवनीत ज्ञानरुप अग्नीच्या संबंधाने विवेकपूर्वक घडविले; आणि त्याचा उत्तम परिपाक होऊन त्या लोण्याचे सुगंधी साजूक तूप झाले, ते म्हणजे *गीता* होय. ।।५२।।

  वैराग्यवान देखील या गीतेची इच्छा करतात. संतदेखील नेहमी या गीतेचा अनुभव घेतात. *'तो परमात्मा मी आहे'* अशा अभेद भावात असणारे ब्रम्हनिष्टदेखील या गीतेत रममाण होतात.  ।।५३।।

  भक्त जिचे परम श्रद्धेने श्रवण करतात, जी त्रैलोक्यात प्रथम वंदनीय आहे, जी भीष्मपर्वात प्रसंगाच्या अनुरोधाने सांगितली आहे.  ।।५४।।

  ती " *भगवतगीता*" होय. ब्रम्हदेव आणि महादेव तिची स्तुती करतात, सनकादिक परम श्रद्धेने तिचे श्रवण, मनन, पठण करतात. ।।५५।।

  शरद ऋतूतील चंद्रकलेत असलेले कोवळे अमृतकण चकोर पक्षांची पिल्ले जसे अतिशय मृदू मनाने वेचतात.  ।।५६।।

  त्या प्रमाणे श्रोत्यांने चित्त शुद्ध करून एकाग्रतेने, अत्यन्त हळुवार पणे *भगवदगीतेचा*अनुभव घ्यावा.  ।।५७।।

 शब्दांशिवाय या गीतेच्या अर्थाची मनातल्या मनात चर्चा करावी. इंद्रियांना नकळत याच्या अर्थाचा अनुभव घ्यावा. वक्ताच्या मुखातून शब्द प्रकट होण्यापूर्वीच त्यातील सिद्धांताशी एकरूप होऊन राहावे. ।।५८।।

  ज्या प्रमाणे भ्रमर कमलदलाला समजू न देता त्यातील पराग सेवन करतात, त्याप्रमाणे हा ग्रंथ जाणून घेण्याची पद्धत आहे.  ।।५९।।

  नभामध्ये चंद्रमा उदय पावला, की चंद्रविकासी कुमुदनी प्रफुल्ल होतात आणि आपले पाण्यातील स्थान न सोडता त्याला अलिंगन देण्याचे परमसुख जाणतात. ।।६०।।

*हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे*
    *हरे राम हरे राम राम राम हरे हरे*

💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢
*"वसुदेव सुतं देवं कंस चाणुर मर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगदगुरुम्।।"*
💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢

     💠🌹 *राम कृष्ण हरी* 🌹 💠

🔺🔅🔺🔅🔺🔅🔺🔅🔺🔅🔺

卐ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका卐=अध्याय १ला :- अर्जुनविषादयोगः-ओवी क्रं-२१ ते ४०

     卐 ॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥* *卐*
  💎 *॥ ॐ श्रीगणेशाय नमः॥* 💎
 *अध्याय पहिला :- अर्जुनविषादयोगः*
  🌹 *ओवी क्रमांक :- २१ ते ३०* 🌹
       

💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢
*हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे*
    *हरे राम हरे राम राम राम हरे हरे*
💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢
🍁 🌟 *~_卐_~* *श्री ज्ञानेश्वरी प्रारंभ* *~_卐_~* 🌟🍁

*आतां अभिनव वाग्विलासिनी । ते चातुर्यार्थकलाकामिनी* ।
ते शारदा विश्वमोहिनी । नमिली मियां ॥ २१ ॥

मज हृदयीं सद्‍गुरु । जेणें तारिलों हा संसारपूरु ।
म्हणौनि विशेषें अत्यादरु । विवेकावरी ॥ २२ ॥

जैसें डोळ्यां अंजन भेटे । ते वेळीं दृष्टीसी फांटा फुटे ।
मग वास पाहिजे तेथ । प्रगटे महानिधी ॥ २३ ॥

कां चिंतामणी जालियां हातीं । सदा विजयवृत्ति मनोरथीं ।
तैसा मी पूर्णकाम श्रीनिवृत्ति । ज्ञानदेवो म्हणे ॥ २४ ॥

म्हणोनि जाणतेनें गुरु भजिजे । तेणें कृतकार्य होईजे ।
जैसें मुळसिंचनें सहजें । शाखापल्लव संतोषती ॥ २५ ॥

कां तीर्थें जियें त्रिभुवनीं । तियें घडती समुद्रावगाहनीं ।
ना तरी अमृतरसास्वादनीं । रस सकळ ॥ २६ ॥

तैसा पुढतपुढती तोचि । मियां अभिवंदिला श्रीगुरुचि ।
जो अभिलषित मनोरुचि । पुरविता तो ॥ २७ ॥

आतां अवधारा कथा गहन । जे सकळां कौतुकां जन्मस्थान ।
कीं अभिनव उद्यान । विवेकतरूचें ॥ २८ ॥

ना तरी सर्व सुखाचि आदि । जे प्रमेयमहानिधि ।
नाना नवरससुधाब्धि । परिपुर्ण हे ॥ २९ ॥

कीं परमधाम प्रकट । सर्व विद्यांचे मूळपीठ ।
शास्त्रजाता वसौट । अशेषांचें ॥ ३० ॥

   🌹 *मराठी अर्थ*🌹

  *(सरस्वती-वंदन)* या नंतर नित्यनूतन प्रतिभा आणि वाणीच्या रुपाने क्रीडा करणारे चातुर्य, अर्थ व कला यांची कामिनी, विविध रस आणि अलंकार युक्त मधुर भाषेद्वारा संपूर्ण विश्वाला मोहित करणारी अशी जी शारदा, तिला मी विनम्र भावाने नमस्कार करतो.  ।।२१।।

  *(सद्गुरु-स्तवन)* श्री सद्गुरूंनी सांगितलेले ज्ञान मी माझ्या हृदयामध्ये साठविले ; त्या मुळे मला भवसागर तरुण जाता आला. म्हणून अंतःकरणातील विवेकावर माझे आत्यंतिक प्रेम आहे.  ।।२२।।

  *ज्या प्रमाणे* पायाळू माणसाच्या डोळ्यात अंजन घातले असता त्याची दृष्टी सर्वत्र पसरते आणि त्याला भूमीमध्ये असणाऱ्या संपत्तीचा ठसा दिसू लागतो.  ।।२३।।

  *मनोकामना* पूर्ण करणारा चिंतामणी हाती आला असता सर्व हेतू पूर्ण होतात, त्या प्रमाणे सद्गुरु निवृत्तीनाथांच्या मूळे मी पूर्णकाम झालो आहे. माझ्या सर्व सदिच्छा पूर्ण झाल्या आहेत, असे ज्ञानदेव म्हणतात.  ।।२४।।

  *या साठी* जाणकारांनी सद्गुरुवर परम श्रद्धा ठेवून आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावे, म्हणजे जीवन कृतकृत्य होईल. जसे, झाडाच्या मुळाला पाणी घातले असता फांद्या व पाने सहजच विकसित होतात.  ।।२५।।

  *एका समुद्र* स्नानामुळे त्रैलोक्यांत जेवढी तीर्थे आहेत, त्या सर्वांचे स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते ; किंवा एका अमृत रसाच्या सेवनाने जगातील सर्व रस सेवन केल्या प्रमाणे होते.  ।।२६।।

  *तसे एका सद्गुरूंना* वंदन केले असता, सर्वांना वंदन केल्याचे पुण्य प्राप्त होते ; म्हणून मी वारंवार सद्गुरूंना वंदन करतो, जे सद्गुरु मनातील सर्व सदिच्छा पूर्ण करतात.  ।।२७।।

  *आता सखोल* विचारांची कथा श्रवण करा. ही कथा सर्वांच्या मनात कौतुक उत्पन्न करणारी आहे अथवा विवेकरूपी वृक्षाचे नाविन्यपूर्ण उद्यान आहे.  ।।२८।।

  *ही महाभारतातील* गीता रुपी कथा सर्व मूळ कारण आहे. हे सर्व प्रमुख सिद्धांताचे भांडार आहे किंवा नवरसांनी परिपूर्ण भरलेला अमृताचा सागर आहे.  ।।२९।।

  *किंवा महाभारताच्या* रुपाने मोक्षच प्रगटलेला आहे. हे सर्व विद्यांचे मूळपीठ आहे. जगातील सर्व ज्ञानाचे आश्रयस्थान आहे.  ।।३०।।


*हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे*
    *हरे राम हरे राम राम राम हरे हरे*

💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢
*"वासुदेव सुतं देवम् कंस चानुर मर्दनम् देवकी परमानंदम् कृष्णम् वंदे जगदगुरुम्।।"*
💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢

     💠🌹 *राम कृष्ण हरी* 🌹 💠


🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉卐 ॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥* *卐*
  💎 *॥ ॐ श्रीगणेशाय नमः॥* 💎
 *अध्याय पहिला :- अर्जुनविषादयोगः*
  🌹 *ओवी क्रमांक :- ३१ ते ४०* 🌹

💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢
*हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे*
    *हरे राम हरे राम राम राम हरे हरे*
💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢
🍁 🌟 *~_卐_~* *श्री ज्ञानेश्वरी प्रारंभ* *~_卐_~* 🌟🍁

  🍁 *श्री ज्ञानेश्वरी प्रारंभ* 🍁

 *ना तरी सकळ धर्मांचें माहेर । सज्जनांचे जिव्हार* ।
लावण्यरत्‍नभांडार । शारदेचें ॥ ३१ ॥

   नाना कथारूपें भारती । प्रकटली असे त्रिजगतीं ।
आविष्करोनि महामतीं । व्यासाचिये ॥ ३२ ॥

म्हणौनि हा काव्यांरावो । ग्रंथ गुरुवतीचा ठावो ।
एथूनि रसां झाला आवो । रसाळपणाचा ॥ ३३ ॥

तेवींचि आइका आणिक एक । एथूनि शब्दश्री सच्छास्त्रिक ।
आणि महाबोधीं कोंवळीक । दुणावली ॥ ३४ ॥

एथ चातुर्य शहाणें झालें । प्रमेय रुचीस आलें ।
आणि सौभाग्य पोखलें । सुखाचें एथ ॥ ३५॥

माधुर्यीं मधुरता । श्रुंगारीं सुरेखता ।
रूढपण उचितां । दिसे भलें ॥ ३६ ॥

एथ कळाविदपण कळा । पुण्यासि प्रतापु आगळा ।
म्हणौनि जनमेजयाचे अवलीळा । दोष हरले ॥ ३७ ॥

आणि पाहतां नावेक । रंगीं सुरंगतेची आगळीक ।
गुणां सगुणपणाचें बिक । बहुवस एथ ॥ ३८ ॥

भानुचेनि तेजें धवळलें । जैसे त्रैलोक्य दिसे उजळिलें ।
तैसें व्यासमति कवळिलें । मिरवे विश्व ॥ ३९ ।।

कां सुक्षेत्रीं बीज घातलें । तें आपुलियापरी विस्तारलें ।
तैसें भारतीं सुरवाडलें । अर्थजात ॥ ४० ॥

         🍁 *मराठीत अर्थ* 🍁

*श्री ज्ञानदेव माउली ३१व्या ओवी च्या प्रारंभी म्हणतात*
  *महाभारत* हे सर्व धर्माचे माहेर आहे, सज्जनांच्या जिव्हाळ्याचा, आनंदाचा विषय आहे; आणि सरस्वतीच्या सौंदर्यरूपी रत्नांचे भांडार आहे. ।।३१।।

  *सरस्वती* महर्षी व्यासांच्या विशाल बुद्धीत प्रगट होऊन विविध कथेच्या त्रैलोक्यात प्रसारित झाली. ।।३२।।

  *हा महाभारत* ग्रंथ सर्व काव्यग्रंथाचा राजा आहे. या ग्रंथाच्या ठिकाणी महानतेची परिसीमा झाली आहे. या ग्रंथा पासून काव्यातील रसांना रसाळपणाचा डौल आला आहे. ।।३३।।

  *तसेच,* या ग्रंथाचे आणखी महत्व श्रवण करा. महाभारतापासून शब्दरूप संपत्तीला शास्त्रीयता प्राप्त झाली आणि ब्रम्हज्ञानाच्या ठिकाणी कोवळिकता अधिकच वाढली. ।।३४।।

  *या महाभारतात* चातुर्य शहाणे झाले, सिद्धांताना अमृतमय गोडी प्राप्त झाली आणि सुखाचे ऐश्वर्य अधिकच पुष्ट झाले.  ।।३५।।

   *माधुर्याला* मधुरता, शृंगाराला सुरेखपणा आणि योग्य वस्तुंना श्रेष्ठपणा येऊन त्या सर्व उत्तम रीतीने शोभून दिसू लागल्या.  ।।३६।।

  *यातील* कथेपासून कलांना विशेष कौशल्य प्राप्त झाले. पुण्याचा प्रताप वाढू लागला. महाभारताच्या श्रावणाने जनमेजयाचे ब्रम्हहत्येचे दोष नाहीसे झाले.  ।।३७।।

  *सुक्षमबुद्धीने* महाभारताचे निरीक्षण केले असता असे दिसून येते की, विविध कलांतील गुण त्याने वाढले. या कथेमुळे सद्गुणांचें सामर्थ्य प्रगट झाले.  ।।३८।।

  *सूर्याच्या* तेजाने त्रैलोक्य जसे उजळून निघते, त्या प्रमाणे महर्षी व्यासांच्या विशाल बुद्धीतून निर्माण झालेल्या या कथेमुळे सर्व जगावर ज्ञानाचा प्रकाश पसरला आणि ते शोभून दिसू लागले.  ।।३९।।

  *उत्तम* जमिनीत बी पेरले असता जसा त्याचा सहज विस्तार होत जातो, त्या प्रमाणे महाभारतात सर्व विषय शोभायमान झाले आहेत. ।।४०।।

*हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे*
    *हरे राम हरे राम राम राम हरे हरे*

💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢
*"वासुदेव सुतं देवम् कंस चानुर मर्दनम् देवकी परमानंदम् कृष्णम् वंदे जगदगुरुम्।।"*
💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢

     💠🌹 *राम कृष्ण हरी* 🌹 💠

🔺🔅🔺🔅🔺🔅🔺🔅🔺🔅🔺

ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका 卐अध्याय १ला :- अर्जुनविषादयोगः=ओवी क्र :- ०१ ते २०

*卐 ॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥* *卐*
  💠 *॥ ॐ श्रीगणेशाय नमः॥* 💠
🙏अध्याय पहिला :- अर्जुनविषादयोगः-(ओवी क्रमांक :- ०१ ते १०)
       


👏हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
हरे राम हरे राम राम राम हरे हरे👏

        卐-श्री ज्ञानेश्वरी प्रारंभ-卐

ॐ नमो जी आद्या । वेद प्रतिपाद्या*।
जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा* ॥ १ ॥

देवा तूंचि गणेशु । सकलार्थमतिप्रकाशु ।
म्हणे निवृत्तिदासु । अवधारिजो जी ॥ २ ॥

हें शब्दब्रह्म अशेष । तेचि मूर्ति सुवेष ।
जेथ वर्णवपु निर्दोष । मिरवत असे ॥ ३ ॥

स्मृति तेचि अवयव । देखा आंगीक भाव ।
तेथ लावण्याची ठेव । अर्थशोभा ॥ ४ ॥

अष्टादश पुराणें । तींचि मणिभूषणें ।
पदपद्धति खेवणें । प्रमेयरत्‍नांचीं ॥ ५ ॥

पदबंध नागर । तेंचि रंगाथिले अंबर ।
जेथ साहित्य वाणें सपूर । उजाळाचें ॥ ६ ॥

देखा काव्य नाटका । जे निर्धारितां सकौतुका ।
त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका । अर्थध्वनि ॥ ७ ॥

नाना प्रमेयांची परी । निपुणपणें पाहतां कुसरी ।
दिसती उचित पदें माझारीं । रत्‍नें भलीं ॥ ८ ॥

तेथ व्यासादिकांच्या मतीं । तेचि मेखळा मिरवती ।
चोखाळपणें झळकती । पल्लवसडका ॥ ९ ॥

*देखा षड्दर्शनें म्हणिपती । तेची भुजांची आकृति* ।
*म्हणौनि विसंवादे धरिती । आयुधें हातीं ॥ १० ॥*



     🍁    मराठीत अर्थ   🍁

*(आत्मरूप-वंदन)*अनादीसिद्ध वेदांनी वर्णन केलेल्या , ज्याच्या त्याच्या स्वतः प्रत्येयास येणाऱ्या , विश्वस्वरूप निर्गुण आत्मरूपा , तुझा जयजयकार करून तुला नमस्कार करत आहे .।।1।।

   *(ओंकार रूप गणेश वंदन)* हे देवा ! सर्व विश्वाच्या बुद्धीला प्रकाश देणारा जो गणेश , तो तूच आहेस . निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर म्हणतात , तो गणेश कसा आहे ते अवधानपूर्वक ऐक. ।।2।।

  *संपूर्ण* वेद हीच जणू काही पोषाख केलेली  गणेशाची मूर्ती होय आणि तिच्या ठिकाणी निर्दोष वर्णरूपी शरीराचे सौंदर्य शोभून दिसते आहे.।।3।।

  *मन्वादिकांच्या* स्मुर्ती हे त्याचे अवयव आहते. ते अवयव या स्मुर्तीतील अर्थ-सौंदर्याने जणू लावण्याची केवळ खाणच बनले आहेत. ।।4।।

  *अठरा* पुराणे हे गणपतीच्या अंगावरील रत्नखचित अलंकार आहेत . त्यामध्ये सांगितलेली ही रत्ने; आणि शब्दांची छंदयुक्त रचना ही त्यांची कोंदणे आहेत ।।5।।

  *लालित्यपूर्ण* पदरचना हेच उत्कृष्ट रंगाने रंगविलेले वस्त्र आहे. शब्द-अलंकार आणि अर्थ-अलंकार हे त्या वस्रवरील तेज:पुंज दिसणारे जरीचे तलम तंतू आहेत.।।6।।

  *काव्य* आणि नाटक यांचा कौतुकाने विचार केला आसता, त्या गणपतीच्या पायातील रूणझुंणाऱ्या छोट्या-छोटया घागऱ्या आहेत अर्थ हा त्या घागऱ्यांना  बसविलेल्या घुंगराचा मंजूळ असा ध्वनी आहे.।।7।।

  *व्यास*,वाल्मिकी ,भरतमुनी यांच्या काव्य नाटकातील विविध सिद्धांताच्या शब्दांचा एकाग्रतेने अभ्यास केला , तर त्यात कवीचे अलौकिक कौशल्य दिसून येते . अशी ही  अनमोल शब्द-घागऱ्यांतील उत्तमोत्तम रत्ने आहेत ।।8।।

  *महर्षी* व्यासादिकांची बुद्धी ही गणपतीची मेखला म्हणजे कटिभूषण होय. त्याला लोंबत असलेल्या मोत्यांच्या पदरातील घोष हे त्या बुद्धीतील शुद्धत्व सात्विकपणे झळकत आहे.।।9।।

  *गणपतीचे* सहा हात ही सहा शास्त्रे होत ; म्हणून त्यांतील विविध प्रकारचा अभिप्राय ही त्या त्या हातातील वेगवेगळी शस्त्रे होत.।।10।।


*हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे*
    *हरे राम हरे राम राम राम हरे हरे*
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

*卐 ॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥* *卐*
  💠 *॥ ॐ श्रीगणेशाय नमः॥* 💠
💢 *अध्याय पहिला :- अर्जुनविषादयोगः* 💢
  🌹 *ओवी क्रमांक :- ११ ते २०* 🌹
     
*हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे*
    *हरे राम हरे राम राम राम हरे हरे

卐-श्री ज्ञानेश्वरी प्रारंभ-卐

तरी तर्कु तोचि फरशु । नीतिभेदु अंकुशु ।
वेदांतु तो महारसु । मोदकु मिरवे ॥ ११ ॥

एके हातीं दंतु । जो स्वभावता खंडितु ।
तो बौद्धमतसंकेतु । वार्तिकांचा ॥ १२ ॥

मग सहजें सत्कारवादु । तो पद्मकरु वरदु ।
धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु । अभयहस्तु ॥ १३ ॥

देखा विवेकवंतु सुविमळु । तोचि शुंडादंडु सरळु ।
जेथ परमानंदु केवळु । महासुखाचा ॥ १४ ॥

 तरी संवादु तोचि दशनु । जो समता शुभ्रवर्णु ।
देवो उन्मेषसूक्ष्मेक्षणु । विघ्नराजु ॥ १५ ॥

मज अवगमलिया दोनी । मिमांसा श्रवणस्थानीं ।
बोधमदामृत मुनी । अली सेविती ॥ १६ ॥

प्रमेयप्रवाल सुप्रभ । द्वैताद्वैत तेचि निकुंभ ।
सरिसेपणें एकवटत इभ- । मस्तकावरी ॥ १७ ॥

उपरि दशोपनिषदें । जियें उदारें ज्ञानमकरंदे ।
तियें कुसुमें मुगुटीं सुगंधें । शोभती भलीं ॥ १८ ॥

अकार चरण युगल । उकार उदर विशाल ।
मकार महामंडल । मस्तकाकारें ॥ १९ ॥

हे तीन्ही एकवटले । तेथ शब्दब्रह्म कवळलें ।
तें मियां श्रीगुरुकृपा नमिलें । आदिबीज ॥ २० ॥


🌺🌹 *मराठी अर्थ*  🌹🌺

  *न्याय* दर्शनातील सोळा पदार्थांचे विश्लेषण करणारा तर्क म्हणजे गणपतीच्या हातातील परशू होय. वैशेषिक दर्शनातील सात पदार्थांचा सिद्धांतभेद हा दुसऱ्या हातातील अंकुश आहे आणि उत्तरमीमांसा दर्शनातील ब्रम्हस्वरूप सिद्धांत हा गणपतीच्या हातातील अमृतमधुर मोदक होय.   ।।११।।

  *वार्तिककरांनी* सांगितलेले आणि स्वभावतःच खंडीत झालेले जी बौद्ध मत आहे, ते एका हातात असणाऱ्या खंडित दाताच्या ठिकाणी शोभते.  ।।१२।।

  *सत्कारवाद* हा गणपतीचा वर देणारा कामलासमान हात होय. हा धर्माची सिद्धी करतो आणि हा अभय देणारा हात आहे.  ।।१३।।

  *गणपतीच्या* ठिकाणी ब्रम्हानंद ही सरळ, निर्मळ आणि चांगले व वाईट याची निवड करण्यास समर्थ अशी सोंड आहे.  ।।१४।।

  *गुरू-शिष्याचा* हा सुखसवांद म्हणजे गणपतीच्या मुखतील दात असून ब्रम्हज्ञान प्राप्त झाल्यानंतर सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी निर्माण होणारी समता हा त्या दातांचा पांढरा रंग होय. ज्ञानदृष्टी म्हणजे त्या विघ्नराजाचे सूक्ष्म असे नेत्र होत.  ।।१५।।

  *पूर्वमीमांसा* आणि उत्तरमीमांसा हाच त्या गणपतीच्या कानांच्या ठिकाणी असून बोध हे त्याचे मदरूपी अमृत मुनिरूपी भ्रमर सेवन करतात, असे मला वाटते.  ।।१६।।

  *वेदशास्त्र* पुराणात सिद्धांतरुपाने संगतलेली तत्वे ही गणपतीच्या अंगावरील तेजयुक्त पोवळी होत. द्वैत आणि अद्वैत मते ही मस्तकावरील गंडस्थळे असून सारखे पणाने ती तेथे एकत्र झाली आहेत.  ।।१७।।

  *ज्ञानरूपी* मकरंद ज्या मध्ये परिपूर्ण भरलेला आहे, अशी ईशावास्य इत्यादी दहा उपनिषदे ही जणू सुगंधी फुले असून ती गणपतीच्या मुकुटावर उत्तम तऱ्हेने शोभून दिसत आहेत.  ।।१८।।

  *ओंकाराची* पहिली अकारमात्रा हे गणपतीचे दोन्ही पाय आहेत. दुसरी उकरमात्रा हे त्याचे मोठे पोट आहे. तिसरीमात्रा हा त्याचा मोठ्या वाटोळ्या मस्तकाच्या आकार आहे.  ।।१९।।

  *अकार, उकार, मकार* या तिन्ही मात्रा एकत्रित झाल्या, म्हणजे त्या ओंकारात संपूर्ण वेद संक्षेपाने समाविष्ट होत असतो. त्या बिजरूप ओंकाररूप गणपती देवरायास मी सद्गुरु श्री निवृत्तीनाथ यांच्या कृपेने नमस्कार करतो.  ।।२०।।



*हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे*
    *हरे राम हरे राम राम राम हरे हरे*
*"वासुदेव सुतं देवम् कंस चानुर मर्दनम् देवकी परमानंदम् कृष्णम् वंदे जगदगुरुम्।।"*


     🙏🙏🙏🙏राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏

Thursday, January 31, 2019

Yes, you can buy miracles, but Conditions apply.


👍होय,,,,! चमत्कार विकत मिळतो👍⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡              
                     *त्या लहानशा मुलीने तिच्या बचत बॉक्समधून सर्व नाणी काढुन फ्रॉकच्या खिशात टाकली व शेजारच्या केमिस्टच्या दुकानाच्या पाय-या चढली.*

          *ती काउंटर समोर उभी राहिली व औषध मागु लागली. पण तिची  काउंटरपेक्षा उंची कमी असल्यामुळे तिच्याकडे केमिस्टचे लक्ष गेले नाही. काउंटर वर गर्दी होती त्यामुळे कोणाचेही लक्ष तिच्याकडे गेले नाही..*

  *केमिस्टचा मित्र अमेरिकेहुन आला होता त्याच्याशी बोलण्यात केमिस्ट व्यस्त होता.*

             *त्या छोट्याश्या मुलीने खिशातून एक नाणें काढून काउंटरवर आपटले. त्याचा आवाज ऐकुन सर्वांचे लक्ष तिच्याकडे गेले. तिची युक्ती कामी आली.*

            *केमिस्ट तिच्याकडे आला ,  कौतुकाने व प्रेमाने म्हणाला , काय पाहिजे तुला बेटा..?*

   *"मला चमत्कार पाहिजे"*

       *केमिस्टला तिचे बोलणे न कळल्याने त्याने पुन्हा विचारले.... बेटा तुला काय पाहिजे... ?*

         *ती पुन्हा म्हणाली,  मला चमत्कार पाहिजे..*

         *केमिस्ट तिला म्हणाला , बेटा इथे चमत्कार मिळत नाही...* 

*ती पुन्हा म्हणाली, इथे जर औषध मिळतं तर चमत्कार सुद्धा इथेच मिळेल..!*

         *केमिस्टने विचारले  ,  बेटा तुला हे कोणी सांगितले?*

 *तेंव्हा ती छोटी मुलगी बोबड्या शब्दात म्हणाली..*

       *माझ्या भावाच्या डोक्यात ट्युमर झाला आहे. पप्पांनी आईला सांगितलं की डॉक्टरांनी चार लाख रुपये भरायला सांगितले आहेत, जर वेळेवर उपचार नाही झाले तर एखादा चमत्कारच त्याला वाचवू शकेल. माझे पप्पा रडत रडत आईला सांगत होते की, आपल्याकडे पैसे नाहीत. विकायला दागिने किंवा इस्टेट ही नाही. सर्व पैसे औषधोपचार करण्यात आधीच खर्च झालेत...*

        *त्या छोट्याश्या मुलीचे व केमिस्ट चे संभाषण ऐकून तो परदेशी पाहुणा तिच्या जवळ आला व म्हणाला, तु किती पैसे आणलेत चमत्कार घेण्यासाठी...?*

         *तिने आपली  छोटी मुठ उघडली व सर्व नाणी त्या पाहुण्याच्या हातावर ठेवली . त्याने ती मोजली. ते एकवीस रुपये पन्नास पैसे होते.* 

          *तो पाहुणा त्या निष्पाप व निरागस बालिकेकडे पाहुन हसला व म्हणाला...*

     *बेटा, तु चमत्कार विकत घेतलास....*

*चल, मला तुझ्या भावाकडे घेऊन चल..*

*तो पाहुणा ,जो आपल्या केमिस्ट मित्राला भेटायला अमेरिकेहुन आला होता तो दुसरा तिसरा कोणी नसून न्यूयॉर्कचा प्रसिद्ध न्यूरोसर्जन* *"डॉ.जॉर्ज अँडरसन" होता.* 

         *त्या सर्जनने  मुलीच्या भावाची सर्जरी एकवीस रुपये पन्नास पैशात केली व तो मुलगा मृत्यूच्या दाढेतुन बाहेर काढला..*

       *सर्जरी झाल्यानंतर हॉस्पीटल मधुन बाहेर पडताना  डॉ.जॉर्ज ने मुलीला उचलून घेतले व म्हणाला  ......   बेटा, कोण म्हणतो चमत्कार विकत मिळत नाही..?*

       *जरुर मिळतो...जरुर मिळतो..*

*ती छोटी बालिका मोठ्या श्रद्धेने चमत्कार विकत घेण्यासाठी केमिस्टकडे गेली होती..*

   *निसर्गाने तिचे प्रयत्न, तिचे सत्कर्म,तिची श्रद्धा खरी ठरविली.*

*जर नियत साफ व उद्देश चांगला असेल तर कोणत्या ना कोणत्या रुपात निसर्ग तुमची मदत करतो..*

      *हाच आस्थेचा चमत्कार आहे.* 

*जर ही पोस्ट वाचून तुम्ही गदगद् झाला असाल, आणि तुम्हालाही इतरांसाठी समर्पण भावना असेल, तर निसर्ग तुमच्या कडुनही असा चमत्कार घडविलच..*

*आपल्याबरोबर आपल्या सहवासातील इतर व्यक्तिंचे जीवन आपल्या प्रयत्नामुळे बहरले तर त्या आनंदाचे सोने झाल्याशिवाय रहात नाही.*

⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜
 *निसर्ग हा सर्वश्रेष्ठ न्यायाधीश आहे.*
This is the coppy from whatsapp 

Saturday, January 19, 2019

Keep secret your few things


*स्त्री असो किंवा पुरुष, या गोष्टी  नेहमी गुप्त  ठेवाव्यात*
--------------------------------------------------

आपण आपल्या महत्त्वाच्या खाजगी गोष्टी नेहमी गुप्त ठेवणे आवश्यक आहेत. या गोष्टी इतरांना समजल्या तर भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

*येथे जाणून घ्या अशा  गोष्टी, ज्या नेहमी गुप्तच ठेवाव्यात...*

*१)अपमान -*
जर एखाद्या कारणामुळे अपमानाला सामोरे जावे लागले तर ही गोष्टही गुप्त ठेवावी. इतरांना ही गोष्ट माहिती पडल्यास त्यांच्यासाठी आपण हास्याचा विषय बनू शकतो.

*२)धनहानी -*
साध्यःच्या काळात पैशाला कोणत्याही व्यक्तीच्या शक्तीचे कारण मानले जाते. बहुतांश परिस्थितीमध्ये पैशाच्या आधारावरच नाते निभावले जातात आणि मैत्री केली जाते. यामुळे जर कधी धनहानीचा सामना करावा लागला तर ही गोष्ट गुप्त ठेवावी. धनहानीची गोष्ट इतरांना सांगितली तर अनेक लोक तुमच्यापासून दूर जाऊ शकतात. धनहानी भरून काढण्यासाठी धनाची आवश्यकता असते आणि ही गोष्ट सर्वांना माहिती पडल्यास कोणीही आर्थिक मदत करणार नाही. तसेच तुमच्याजवळ भरपूर पैसा असेल तर ही गोष्टही गुप्तच ठेवावी.

*३)कुटुंबातील वाद -*
अनेक घरांमध्ये वाद होत असतात, ही एक सामान्य गोष्ट आहे. परंतु कौटुंबिक वादाची चर्चा घराबाहेर चुकूनही करू नये. असे केल्यास समाजात कुटुंबाची प्रतिष्ठा कमी होते. कुटुंबाबद्दल वाईट विचार करणारे लोक याचा फायदा घेऊ शकतात.

*४)मंत्र -*
गुरूने दिलेला मंत्र गुप्त ठेवावा. गुरुमंत्र गुप्त ठेवला तरच सिद्ध होतो. गुरुमंत्र गुप्त ठेवून उपासना केल्यास लवकर शुभफळ प्राप्त होते.

*५)दान -*
गुप्त दानाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. शास्त्रानुसार जे लोक गुप्तदान करतात त्यांना अक्षय पुण्याची तसेच देवी-देवतांची विशेष कृपा प्राप्त होते. इतरांना सांगून दान केल्यास पुण्य प्राप्त होत नाही.

*६)पद-प्रतिष्ठा -*
जर तुम्ही एखाद्या मोठा पदावर असाल आणि समाजात मान-सन्मान असेल तर ही गोष्टही गुप्त ठेवावी, एखाद्या अनोळखी व्यक्तीसमोर ही गोष्ट सांगितल्यास अहंकाराचा भाव निर्माण होतो. अहंकार पतनाचे कारण ठरते आणि यामुळे आपली प्रतिष्ठाही कमी होते.

*७)एकांत-*
स्त्री-पुरुषाने  एकांताकडे विशेष लक्ष द्यावे. या कर्माशी संबंधित गोष्टी नेहमी गुप्त ठेवाव्यात. या गोष्टी इतरांना समजल्यास, हे आपल्या चारित्र्य आणि सामाजिक जीवनासाठी योग्य ठरत नाही.
--------------------------------------------------
*संकलन :- सतीश अलोणी @*
Copy from whatsapp    🙏🙏
---------------------------------------------------

Jast read it जिवनात यशस्वी होण्यासाठी काय कराल?*



जिवनात यशस्वी होण्यासाठी काय कराल?*


👉🏽नकारात्मकता नकोच ?

स्वतःशी नकारात्मक गोष्टी बोलणे बंद करा. जेव्हा तुम्ही तुमच्या कारकिर्दीला नवीन दिशा देत असाल तेव्हा तुम्हाला प्रोत्साहन देणारे कदाचित कोणीही नसेल. अशात स्वतःबद्दल अनेक शंका यायला लागतात. तुमच्या नकारात्मक विचारांना तुमाच्यातूनच ताकद मिळते. तुम्ही त्यांच्यावर जेवढे जास्त फोकस करत तेवढेच ते प्रबळ होत जातील. तुमचे बहुतेक नकारात्मक विचार हे फक्त विचार आहेत, ते वस्तुस्थिती नाहीत. जेव्हा तुमचा तुमचे नकारात्मक विचार आणि निराशाजनक गोष्टींवर विश्वास बसू लागेल तेव्हा एक काम करा - तुम्ही ते विचार कुठेतरी लिहून ठेवा. तुम्ही जे काही करत असाल ते तिथेच थांबवा आणि विचार लिहून ठेवा. अशा प्रकारे तुमच्या निराशाजनक विचारांच्या वेगळा लगाम बसेल आणि तुम्ही गोष्टींना त्यांच्या प्रत्यक्ष रुपात जास्त तार्किक होऊन पाहू शकाल आणि वस्तुस्थिती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल.

👉🏽जर असे झाले तर काय?

स्वतःला "जर असे झाले तर काय?" विचारणे बंद करा. "जर असे झाले तर काय?" असे हायपोथेटिकल स्टेटमेंट आहे जे तुमची चिंता आणि ताण वाढवते, आणि ते तुमच्या प्रगतीच्या मार्गातील अडसर आहे. गोष्टी बिघडवायच्या असतील तर त्याचे शेकडो मार्ग आहेत, आणि तुम्ही त्या बिघडतील म्हणून विचार करत बसलात तर कृती कधी करणार? स्वतःला "जर असे झाले तर?" हे विचारणे तुम्हाला केवळ एकाच जागी घेऊन जाऊ शकते, जिथे तुम्हाला जायचे नाहीये, जाणे तुमची गरज नाहीये. पण तुमचे प्लान्स एकदम पक्के असले पाहिजेत. त्यांच्यात सर्व शक्यातांसाठी जागा असली पाहिजे. चिंतिती असल्यामुळे शोधत राहणे आणि भविष्य नजरेसमोर ठेऊन सर्व शक्यतांच्या दृष्टीने रणनीती आखण्याचे अंतर ओळखणे तुमाच्यासाठी आवश्यक आहे.

👉🏽व्यायाम आणि झोप

 आपला व्यायाम आणि झोप यांकडे लक्ष द्या .चांगल्या झोपेचे महत्त्व यावर मी यापेक्षा काही बोलू शकत नाही. जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुमचा मेंदू न्यूरॉन्स मधु ती हानिकारक तत्व काढतो जी जागृत अवस्थेत उपस्थित असतात. समस्या केवळ हीच आहे की मेंदू ही तत्व तेव्हाच काढू शकतो जेव्हा तुम्ही झोपता. जर तुमची झोप पूर्ण झाली नाही तर ही हानिकारक तत्व तुमच्या मेंदूत उपस्थित राहतील आणि तुमचे कार्य शिथिल करतील. या नुकसानाची भरपाई तुम्ही जागरणासाठी चहा कॉफी पिऊन देखील करू शकत नाही म्हणूनच भरपूर काम केल्यानंतर आपले शरीर आणि मेंदू यांना पूर्ण आराम द्या.
तुमचे आत्म-नियंत्रण, ध्यान आणि मेमरी आवश्यक झोप मिळाली नाही तर आणि शांत झोप मिळाली नाही तर कमी होते. झोप अपूर्ण झाली आणि कोणताही तणाव जाणवला नाही तरी देखील अनेक प्रकारची स्ट्रेस हार्मोन्स निघतात जे तुमची प्रोडक्टिविटी कमी करतात. कधी कधी असेही होऊ शकते की तुम्ही कामाच्या जोशात आपली झोप टाळू लागता, परंतु तसे करणे तुमच्या हिताचे नहीये.
Eastern Ontario Research Institute मध्ये झालेल्या एका संशोधनात असे लक्षात आले आहे की १० आठवड्या पर्यंत दिवशी दोन वेळा व्यायाम करणाऱ्या व्यक्ती अधिक सोशल, एकेडमिक आणि एथलेटिक असतात. ते आपल्या बॉडी इमेज च्या बाबतीत जागरूक असतात आणि त्यांच्या आत्मविश्वासाचा स्तर सुद्धा जास्त असतो. सर्वांत चांगली गोष्ट ही आहे की व्यायाम केल्यामुळे त्यांच्या शरीरात वाढणारे लाभदायक हार्मोन्स शरीराला तत्काळ सकारात्मक उर्जेने भरून टाकतात. तसेच शरीरात होणारे फिजिकल परिवर्तन देखील आत्मविश्वासाचा स्तर उंचावण्यात सहाय्यक असतात.
तुम्ही तुमच्या दिवसभराच्या कामांना सांभाळून व्यायाम अशा प्रकारे योजा की तो चुकू नये नाहीतर तुमचा संपूर्ण दिवस वाया जाईल.


Thursday, November 15, 2018

💎"एक चुटकी ज़हर रोजाना"💎

     
  💎"एक चुटकी ज़हर रोजाना"💎
सुना था कभी किसीसे,
की ये दुनिया मोहोब्बत से चलती है,
करीब से जाना तो समझे,
ये स्वार्थ की दुनिया है,
बस जरुरत से चलती है !!






आरती नामक एक युवती का विवाह हुआ और वह अपने पति और सास के साथ अपने ससुराल में रहने लगी। कुछ ही दिनों बाद आरती को आभास होने लगा कि उसकी सास के साथ पटरी नहीं बैठ रही है। सास पुराने ख़यालों की थी और बहू नए विचारों वाली।
आरती और उसकी सास का आये दिन झगडा होने लगा।
दिन बीते, महीने बीते. साल भी बीत गया. न तो सास टीका-टिप्पणी करना छोड़ती और न आरती जवाब देना। हालात बद से बदतर होने लगे। आरती को अब अपनी सास से पूरी तरह नफरत हो चुकी थी. आरती के लिए उस समय स्थिति और बुरी हो जाती जब उसे भारतीय परम्पराओं के अनुसार दूसरों के सामने अपनी सास को सम्मान देना पड़ता। अब वह किसी भी तरह सास से छुटकारा पाने की सोचने लगी.
एक दिन जब आरती का अपनी सास से झगडा हुआ और पति भी अपनी माँ का पक्ष लेने लगा तो वह नाराज़ होकर मायके चली आई।
आरती के पिता आयुर्वेद के डॉक्टर थे. उसने रो-रो कर अपनी व्यथा पिता को सुनाई और बोली – “आप मुझे कोई जहरीली दवा दे दीजिये जो मैं जाकर उस बुढ़िया को पिला दूँ नहीं तो मैं अब ससुराल नहीं जाऊँगी…”
बेटी का दुःख समझते हुए पिता ने आरती के सिर पर प्यार से हाथ फेरते हुए कहा – “बेटी, अगर तुम अपनी सास को ज़हर खिला कर मार दोगी तो तुम्हें पुलिस पकड़ ले जाएगी और साथ ही मुझे भी क्योंकि वो ज़हर मैं तुम्हें दूंगा. इसलिए ऐसा करना ठीक नहीं होगा.”
लेकिन आरती जिद पर अड़ गई – “आपको मुझे ज़हर देना ही होगा ….
 अब मैं किसी भी कीमत पर उसका मुँह देखना नहीं चाहती !”
कुछ सोचकर पिता बोले – “ठीक है जैसी तुम्हारी मर्जी। लेकिन मैं तुम्हें जेल जाते हुए भी नहीं देख सकता इसलिए जैसे मैं कहूँ वैसे तुम्हें करना होगा ! मंजूर हो तो बोलो ?”
“क्या करना होगा ?”, आरती ने पूछा.
पिता ने एक पुडिया में ज़हर का पाउडर बाँधकर आरती के हाथ में देते हुए कहा – “तुम्हें इस पुडिया में से सिर्फ एक चुटकी ज़हर रोज़ अपनी सास के भोजन में मिलाना है।
कम मात्रा होने से वह एकदम से नहीं मरेगी बल्कि धीरे-धीरे आंतरिक रूप से कमजोर होकर 5 से 6 महीनों में मर जाएगी. लोग समझेंगे कि वह स्वाभाविक मौत मर गई.”
पिता ने आगे कहा -“लेकिन तुम्हें बेहद सावधान रहना होगा ताकि तुम्हारे पति को बिलकुल भी शक न होने पाए वरना हम दोनों को जेल जाना पड़ेगा ! इसके लिए तुम आज के बाद अपनी सास से बिलकुल भी झगडा नहीं करोगी बल्कि उसकी सेवा करोगी।
 यदि वह तुम पर कोई टीका टिप्पणी करती है तो तुम चुपचाप सुन लोगी, बिलकुल भी प्रत्युत्तर नहीं दोगी ! बोलो कर पाओगी ये सब ?”
आरती ने सोचा, छ: महीनों की ही तो बात है, फिर तो छुटकारा मिल ही जाएगा. उसने पिता की बात मान ली और ज़हर की पुडिया लेकर ससुराल चली आई.
ससुराल आते ही अगले ही दिन से आरती ने सास के भोजन में एक चुटकी ज़हर रोजाना मिलाना शुरू कर दिया।
 साथ ही उसके प्रति अपना बर्ताव भी बदल लिया. अब वह सास के किसी भी ताने का जवाब नहीं देती बल्कि क्रोध को पीकर मुस्कुराते हुए सुन लेती।
रोज़ उसके पैर दबाती और उसकी हर बात का ख़याल रखती।
सास से पूछ-पूछ कर उसकी पसंद का खाना बनाती, उसकी हर आज्ञा का पालन करती।

कुछ हफ्ते बीतते बीतते सास के स्वभाव में भी परिवर्तन आना शुरू हो गया. बहू की ओर से अपने तानों का प्रत्युत्तर न पाकर उसके ताने अब कम हो चले थे बल्कि वह कभी कभी बहू की सेवा के बदले आशीष भी देने लगी थी।
धीरे-धीरे चार महीने बीत गए. आरती नियमित रूप से सास को रोज़ एक चुटकी ज़हर देती आ रही थी।
किन्तु उस घर का माहौल अब एकदम से बदल चुका था. सास बहू का झगडा पुरानी बात हो चुकी थी. पहले जो सास आरती को गालियाँ देते नहीं थकती थी, अब वही आस-पड़ोस वालों के आगे आरती की तारीफों के पुल बाँधने लगी थी।
 बहू को साथ बिठाकर खाना खिलाती और सोने से पहले भी जब तक बहू से चार प्यार भरी बातें न कर ले, उसे नींद नही आती थी।
छठा महीना आते आते आरती को लगने लगा कि उसकी सास उसे बिलकुल अपनी बेटी की तरह मानने लगी हैं। उसे भी अपनी सास में माँ की छवि नज़र आने लगी थी।
जब वह सोचती कि उसके दिए ज़हर से उसकी सास कुछ ही दिनों में मर जाएगी तो वह परेशान हो जाती थी।
इसी ऊहापोह में एक दिन वह अपने पिता के घर दोबारा जा पहुंची और बोली – “पिताजी, मुझे उस ज़हर के असर को ख़त्म करने की दवा दीजिये क्योंकि अब मैं अपनी सास को मारना नहीं चाहती … !
 वो बहुत अच्छी हैं और अब मैं उन्हें अपनी माँ की तरह चाहने लगी हूँ!”
पिता ठठाकर हँस पड़े और बोले – “ज़हर ? कैसा ज़हर ? मैंने तो तुम्हें ज़हर के नाम पर हाजमे का चूर्ण दिया था … हा हा हा !!!”
"बेटी को सही रास्ता दिखाये,
माँ बाप का पूर्ण फर्ज अदा करे***#pma


Copy from whatsapp 
Copy from whatsapp 
Copy from whatsapp  

Wednesday, November 14, 2018

💍💎 अर्ध्या भाकरीचं कर्ज 💍💎

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

बायको सतत आईवर आरोप करत होती..........
आणितिला आपल्या मर्यादेत राहन्यास सांगत होता...
पण बायको काही गप्प बसण्याचं नावच घेत नव्हती
ती जोरजोरात ओरडून सांगत होती
"मी अंगठी टेबलवरच ठेवली होती
आणि तुमच्या आईशिवाय खोलीत कुणीच् आलेलं नव्हतं..
अंगठी असो वा नसो ती आईनेच उचललीये"
गोष्ट जेव्हा पतिच्या सहनशक्तिच्या बाहेर गेली..
त्याने बायकोच्या जोरदार कानाखाली ठेऊन दिली..
तिन महिन्या पूर्वीच लग्न झालेलं होतं..
पत्नीला ती चापट सहन झाली नाही.ती घर सोडून चालली
आणि जाता जाता पतीला एक प्रश्न विचारला....
कि तुम्हाला तुमच्या आईवर इतका विश्वास का??
तेव्हा पति ने उत्तर दिले
त्या उत्तराला ऐकून
दरवाजा मागे उभी असलेली आई हे ऐकून तिचे मन भरून आले
पति ने पत्नी ला सांगितले..
"जेव्हा मी छोटा होतो तेव्हा वडील वारले
आई अजुबाजूच्या परिसरात झाड़ू मारुन थोड़े पैसे आनायची ज्यात एक वेळेचं
पोट भरायचं.
आई एका ताटात भाकर वाढायची
आणि
रिकाम्या डब्याला झाकुन् ठेवायचि
आणि म्हणायची
माझ्या भाकरी या डब्यात आहेत बाळा तू खा.
मी पण नेहमी अर्धी भाकर खाऊन म्हणायचो
आई माझं पोट भरलय आता मला नाही खायचं.
आईने माझी उष्टी अर्धी भाकर खाऊन माझं पालन पोषण केलं आणि मोठं केलं
आज मी दोन भाकरी कमवायच्या लायकिचा झालो
पण हे कसं विसरु की आईने त्या वेळेस तिच्या भुकेला मारलं,
ती आई या स्तिथिला अशा अंगठी साठी भुकेलि असेल हा मी विचार सुद्धा करू शकत नाही..
तू तर तिन महिन्यापासूनच माझ्या सोबत आहे.
मी तर आईच्या तपश्चर्यला 25 वर्षापासून बघितलय.
हे ऐकून आईच्या डोळ्यात अश्रु आले.
ति समजूच् शकत नव्हती की मुलगा तिच्या अर्ध्या भाकरीचं कर्ज फेड़तोय की
ती मुलाच्या अर्ध्या भाकरीचं कर्ज....
या मेसेज़ला शेयर करायला कोणतीच शपथ नाहिये.
आवडला तर नक्कीच शेयर करा..


🚩🙏(सदर लेख व्हॉट्सप वरून कॉपी केला)
🚩

🚩🙏(सदर लेख व्हॉट्सप वरून कॉपी केला)

Tuesday, November 13, 2018

उद्योग आणि मराठी माणूस.


                     *अत्यंत महत्वाचे*
---              
                -उद्योग आणि मराठी माणूस.-----------

----------------
*_शेतकर्‍यांना  सुखी होण्यासाठी महत्वाच्या  टिप्स_*
--------------------------------
शेतकर्‍यांना आपण राजा म्हणतो, पण तोच आज अडचणीत, दारिद्र्यात, दुष्काळात होरपळत आहे. तो व त्याची पुढची पिढी श्रीमंत, सुखी व्हावी यासाठी काय करायला हवे, यासाठी मी काही टिप्स देत आहे.

*भाग - १*

*१) माहिती घ्या :*
शेतकर्‍यांनो हे जग माहितीचे आहे. ज्याच्याकडे चांगली, जास्त व अद्ययावत माहिती आहे, त्याची फसगत होत नाही. काय करायचे, काय नाही करायचे याचे ज्ञान व योग्य निर्णय घेता येतो. पुस्तके, वृत्तपत्रे, इंटरनेट इत्यादींचा वापर करा व सतत माहिती घेत रहा.

*२) एकत्र या :*
खेकड्याप्रमाणे एकमेकांचे पाय ओढण्याचा गुण सोडा. भाऊबंधकीमुळे इतिहास काळापासून मराठी समाजाचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. तेव्हा एकीचे बळ लक्षात ठेवा. एकीमुळे मानसिक बळ मिळते, प्रगती होते; तेव्हा कुटुंबात, गावात समाजात व भावकीत एकीने वागा.

*3) पुढार्‍यापासून लांब :*
देश स्वतंत्र झाल्यापासून शेतकर्‍यांचा सर्वाधिक वेळ कोणी खाल्ला असेल, तर तो म्हणजे पुढारी. मोर्चा न्यायला, मोठा नेता आला भाषणाला चला, पाणी परिषेदेला चला. नुसती दिशाभूल आणि गंडवागंडवी. पुढार्‍यांच्या नादाला लागून कित्येक शेतकर्‍यांनी शेतीकडे दुर्लक्ष केले, शेती सावकारांना विकली, कुटुंब वार्‍यावर व शेवटी बायको मुलांना दुसर्‍यांच्या शेतावर मोल मजुरी करण्याची वेळ आली. तेव्हा पुढार्‍यापासून दोन हात लांब रहा.

*४) सावकाराचे नाव नको :*
मदर इंडिया सिनेमा तुम्ही बघितला असेल, सावकारीपाशामुळे कसे लाखो करोडो शेतकऱ्यांचे कसे नुकसान झाले. तेव्हा सावकाराचे पैसे कोणत्याही परिस्थितीत घेऊ नका.

*५) व्यापार्‍यापासून सावध :*
अनादी काळापासून शेतकर्‍यांना पिळणारा प्राणी म्हणजे व्यापारी. त्याच्या दर पाडण्याच्या कलेपासून सावध रहा. आपला माल हवंतर उशिरा विका पण व्यापार्‍यांना बळी जाऊ नका. स्वतः व्यापार शिका; व्यापारी, सावकार, पुढारी ह्या त्रिकुटापासून लांब व सावध रहा.

*६) काम म्हणजे भक्ती :*
आपली शेती व काम सोडून १५ दिवस वारीला व देवदेव करणारे शेतकरी पाहिले. शेतकरी १५ दिवस वारीला व शेत, कामधंदा तिकडे वार्‍यावर, अशी अवस्था नसावी. काम ही भक्ती आहे लक्षात ठेवा. कीर्तनकार बाबा रोज २५ हजार कमावतो व तुम्ही ठणठण गोपाळ, तेव्हा जागे व्हा.

*७) एकतरी व्यवसाय :*
शेतीसोबत एकतरी व्यवसाय कराच, फक्त शेतीवर अवलंबून राहू नका. कोणताही असो, छोटा मोठा व्यवसाय सुरू कराच.

*८) एकाने बाहेर :*
घरातील सर्वांनीच शेतीवर अवलंबून राहू नका. घरातील किमान एकतरी मुलाने गावाबाहेर पडा. शहरात, परदेशात, व्यवसायात जा. बाहेरील पैसा भांडवल म्हणून वापरता येईल व सावकारी पाश पडणार नाही.

*९) स्वतःसाठी अन्न :*
मी अनेक ऊस, द्राक्षं उत्पादक व बड्या शेतकर्‍यांना भेटलो, ते पण स्वतःसाठी लागणारे धान्य, भाजीपाला बाजारातून विकत आणतात. तेव्हा किमान १० गुंठे जमिनीत स्वतःसाठी लागणारी फळे, भाजीपाला, धान्य घरी वर्षभर पुरेल एवढे पिकवा. केवळ पैशासाठी शेती करू नका, स्वतःसाठी सकस आहार घ्या.

*१०) स्त्रीभ्रूण हत्या नको :*
मुलगा होण्याच्या हव्यासापोटी स्त्रीभ्रूण हत्या करू नका. स्त्री म्हणजे लक्ष्मीचे रूप. जर तुम्ही लक्ष्मीची हत्या करत असाल, तर तुमच्या घरात श्रीमंती कशी येणार. अशा विचाराने तुमच्या घरात कधीही समृध्दी येणार नाही.

*११) कमी खर्चात लग्न :*
मोठा मंडप घातला, गाव लाडू, जिलेबी खाऊन गेले, पण कर्ज फेडणार तुम्ही. नाही तर मग दोन एकर विकायचे. शेवटी अक्षदा पडली की संपलं, पुन्हा कोणीही येणार नाही.

*१२) मुलामुलीत समान वाटणी :*
मृत्युपत्रात मुला व मुलींना समान वाटणी द्या, कारण तुमच्यावर सर्वाधिक प्रेम करणारी मुलगीच असते. प्रेतावर रडणारी फक्त बायको व मुलगीच असते व वृध्दाश्रमात पाठवणारा मुलगा असतो हे लक्षात ठेवा. म्हातारं कधी टपकतयं व दोन एकर कधी विकतोय याची वाट पाहणारा मुलगा असतो, हे लक्षात ठेवा.

*१३) बायकोच्या नावे १ एकर :*
जिने तुमची अर्धांगिनी म्हणून जीवन काढले, तिला तुमच्या मृत्यूनंतर कोणत्याही सुना सांभाळणार नाहीत हे लक्षात ठेवा. तेव्हा किमान एक एकर जमीन बायकोच्या नावे करा, नाहीतर तिला म्हातारपणी जनावराच्या गोठ्यात जागा दिली जाईल.

आमच्या लेखांसंबंधी अधिक माहिती, सूचना, संदर्भ किंवा मते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. त्या अनुषंगाने पुढील लेखात त्यासंबंधीचे विवेचन करण्याचा व माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असेल. महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा यासाठी आम्ही काम करतोय, तुम्ही खारीचा वाटा उचला, हा लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा. 

- प्रा. प्रकाश भोसले, सीईओ ई-ब्रँडिंग इंडिया
व्हॉटसअॅप -९८६७८०६३९९
-----------------------------
*नवी अर्थक्रांतीची बिजनेसविषयक पुस्तके विकत घेण्यासाठी -*
http://bit.ly/2OMAD3q
(सदरील लेख व्हॉट्सप वरून कॉपी पेस्ट केला )

                       
              🤗Believe in the self ,self is infinite  🤗

Monday, November 12, 2018

🌱उसावरील रोग व त्यावरील उपाय🌱

           🌾🌱🌲कृषिसमर्पण🌾🌱🌲


🎋 [उसावरील रोग व त्यावरील उपाय]🎋

   (1)==  चाबूक काणी 🎋,,,,,
               ===>    चाबूक काणी हा रोग युस्टिलॅगो सायटॅमिनी बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होते. हा रोग उसाचे को - ७४० या जातीवर जास्त प्रमाणत आढळतो. ऊस पीक वाढीच्या कोणत्याही अवस्थेत हा रोग दिसून येतो. या रोगाचे मुख्य लक्षण म्हणजे रोगग्रस्त उसाचे शेंड्यातून चकचकीत चंदेरी रंगाचा चाबकाप्रमाणे निमुळता होत जाणारा पट्टा बाहेर पडतो. लवकरच पट्ट्यावरील चंदेरी आवरण फाटते व आतील काळा भाग उघडा होतो. हा काळा भाग म्हणजे बुरशीचे बीजाणू होत. हे बीजाणू हवेद्वारे विखुरतात व निरोगी उसाचे डोळ्यावर पडतात. त्यावर रोगाचा प्रादुर्भाव होतो. अशा तर्हेने रोग शेतात पसरतो. काणी रोगामुळे उसाची वाढ खुंटते, ऊस बारीक होतो, पाने अरुंद व लहान होतात, त्यामुळे उत्पादनात घट येते.लागवडीच्या उसापेक्षा खोडव्यामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. या रोगाचा प्रसार बेण्याद्वारे आणि हवेद्वारे होतो.

                🌲🌱🌲🌾🌱🌾🌱🌲🌲
               🌾🤔  [नियंत्रणाचे उपाय ]🤔🌱
                🌱🌲🌱😃🌲🌱🌲🌱🌾
१) रोगग्रस्त उसाचा बेण्यासाठी वापर करू नये. निरोगी बेणे वापरावे.
२) लागवडीच्या उसात काणी रोगाचा प्रादुर्भाव ५ टक्क्यापेक्षा जास्त असेल तर अशा उसाचा खोडवा घेऊ नये.
३)रोग प्रतिकारक वाणांचा वापर करावा.
४) ३ ते ४ वर्षानंतर बेणे बदलावे.
५) शेतात कणीचा पट्टा दिसताच तो प्लॅस्टिकच्या पिशवीत अलग कापून घ्यावा, संपूर्ण बेट मुळासकट उपटून काढावे व जाळून नष्ट करावे.
६) लागवडीपूर्वी उसाचे बेणे १०० ग्रॅम कार्बेन्डॅझिम व १०० लिटर पाणी या द्रावणात १० मिनिटे बुडवून नंतर लागवड करावी.
७) लागवडीसाठी रोगप्रतिकारक जातीचा वापर करावा. उदा. कोव्हीएसआर-९८०५.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------



            🎋-[2]-  =>गवताळ वाढ. 🎋
                              हा रोग मायाकोप्लाझ्मा नावाच्या विषाणूपासून होतो. याचे प्रमुख लक्षण म्हणजे उसाचे बुंध्याकडील बाजूस असलेल्या डोळ्यातून असंख्य फुटवे येतात व त्याला गवताच्या थेंबाचे स्वरूप येते. फुटवे रंगाने पिवळसर पांढरट असून त्याची पाने अरुंद व लहान असतात. हा रोग बेण्याद्वारे, ऊस कापणीच्या कोयत्याद्वारे आणि मावा किडीद्वारे पसराव होते

            🌾🌲🌳🌱🌾🌲🌳🌲🌾🌱
              🌲🌾      नियंत्रणाचे उपाय. 🌲🌾🌱
                   🌲🌾🌱🌳🌲🌾🌱🌳🌲
१) लागवडीसाठी निरोगी बेण्याचा वापर करावा.
२) उष्णजल किंवा बाष्पउष्ण हवा प्रक्रिया देऊन तयार केलेल्या बेणे मळ्यातील बेणे नवीन लागवडीसाठी वापरावे.
३) रोगट उसाचा खोडवा ठेवू नये.
४) मावा किडीद्वारे या रोगाचा प्रसार होत असल्यामुळे मावा किडीचे किटकनाशकाद्वारे नियंत्रण करावे.
५) गवताळ वाढीचे बेणे मुळासकट काढून नष्ट करावे.
६) बेणे लागवडीपूर्वी ५०० किंवा १००० पीपीएम लिंडरमायसीनमध्ये बुडवून लावावे.
७) लागवडीकरिता रोगप्रतिकारक जातींची निवड करावी.
उदा. कोव्हीएसआर-९८०५, कोव्हीएसआर-४९४.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------


     [3]==> गाभा रंगणे (लाल कांडी. )  🎋
                  गाभा रंगणे हा रोग कोलिटोट्रायकम फालकॅटम या बुरशीचे प्रादुर्भावामुळे होतो. सुरुवातीच्या अवस्थेत हा रोग ओळखता येत नाही, परंतु पावसाळयानंतर जेव्हा उसाची वाढ थांबून साखर तयार होण्याचे प्रक्रियेस सुरुवात होते तेव्हा या रोगाची लक्षणे दिसून येतात. रोगग्रस्त उसाचे शेंड्यापासून तिसरे अथवा चवथे पान निस्तेज पडून वाळते व नंतर पूर्ण शेंडा वाळतो. रोगग्रस्त ऊस लांबीतून उभा कापला असता आतील गाभा लाल झालेला आढळून येतो. त्यात अधून - मधून आडवे पांढरे पट्टे दिसतात. कालांतराने ऊस पोकळ होतो, आकसतो व सालीवर सुरकुत्या पडतात. अशा उसाला अल्कोहोलसारखा वास येतो. या रोगाचा प्रसार बेण्याद्वारे होतो
            🌱🌳🌾🌲🌱🌲🌾🌾🌲
                 *नियंत्रणाचे उपाय-
          🌲🌱🌲🌾🌲🌾🌾🌲🌾
          १) लागवडीसाठी निरोगी बेण्याचा वापर करावा.
२) उष्णजल किंवा बाष्पयुक्त हवा प्रक्रिया देऊन तयार केलेल्या बेणे मळ्यातील बेणे नवीन लागवडीसाठी वापरावे.
३) लागवडीपूर्वी उसाचे बेणे कार्बेन्डिझम १०० ग्रॅम बुरशीनाशक १०० लिटर पाण्यात मिसळून त्या द्रावणात १० ते १५ मिनिटे बुडवून लागवड करावी.
४) ऊस कापण्याचा कोयतासुद्धा निर्जंतूक करून घ्यावा.
५) रोगग्रस्त शेतातील उसाचा कापणी शक्य तेवढ्या लवकर करवी. रोगग्रस्त उसाचा खोडवा घेऊ नये.
६) ऊस कापणीनंतर त्या शेतात नवीन ऊस लागवड करू नये. पिकाची फेरपालट करवी.
७) कापणीनंतर शेतातील पाचाट, वाळा, धसकटे इत्यादी जागेवरच जाळून नष्ट करवीत.
८) उसाला पाणी कमी द्यावे.
९) ज्या भागात रोगाचा प्रादूर्भाव झालेला असेल, तेथे ३ ते ४ वर्षे उसाचे पीक घेऊ नये.
१०) पिकांची फेरपालट करावी.
११) रोगप्रतिकारक जातीची लागवड करावी. उदा. को-७३१४, को-५७६७

--------------------------------------------------------------------------------------------------------------------

[4]==>   उसावरील मर* 🎋

हा रोग फ्युजेरियम मोनिलीफॅरमी व सेफॅलोस्पोरीयम सॅफॅरी या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव देठ कुजव्या किंवा मुळे पोखरणार्‍या अळीच्या संयोगाने मोठ्या प्रमाणात होतो. रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या उसाची पाने पिवळसर व निस्तेज होतात आणि नंतर वळतात . शेवटी प्रादुर्भाव वाढल्यास ऊस पुर्णपणे वाळतो, पोकळ होतो व वजनाला हलका भरतो. मुळ्य कुजतात, ऊस अलगपणे उपटून येतो. ऊस कांड्याचे समान दोन भाग केलेल्या कांड्याचा आतील भाग करड्या रंगाचा व लालसर पडलेला दिसतो आणि बराचसा भाग तंतुमय झालेला दिसतो.

*नियंत्रणाचे उपाय-*
 १) निरोगी बेणे वापरावे.
२) रोगट उसाच खोडवा ठेवू नये.
३) मुळे पोखरणार्‍या किडीचा बंदोबस्त करावा.
४) फेरपालटीची पिके घ्यावीत.
५) प्रादुर्भाव झालेल्या शेतातील बेणे वापरू नये.
६) रोगट उसाचे अवशेष गोळा करून त्यांचा नायनाट करवा.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------


🎋 *पोक्का बोईंग (पोंगा कुजणे)* 🎋

हा रोग फ्युजेरियम मोनिलीफॉरमी या बुरशीपासून होतो. पोक्का बोईंग याचा अर्थ शेंड्याजवळील पानाचा आकार बदलणे किंवा पोंगा कुजणे असा होतो. अलिकडे या रोगाची लागण महाराष्ट्रात दिसून आली आहे. पोक्का बोईंग रोगाची लक्षणे सर्वप्रथम पोंग्याजवळील पानावर दिसतात. सुरुवातीला देठाजवळ पाने पिवळी पडतात. रोगाची तीव्रता वाढल्यास पानावर सुरकुत्या पडतात. पाने अंकुचित होतात आणि शेंडा व पोंगा कुजतो. उसाची वाढ खुंटते, कांड्या आखूड होतात. काही वेळेस फांद्याही फुटातात. उसाची पाने एकमेकात गुंतलेली असतात. या रोगाचा प्रसार हवेद्वारे होतो.

*नियंत्रणाचे ऊपाय-*
१) २० ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा २० ग्रॅम मॅन्कोझेब अथवा १० ग्रॅम कार्बेन्डिझम यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२) उसाची लागवड लवकर करावी. उशीरा म्हणजे एप्रिल - मी मध्ये उसाची लागवड करू नये.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------

🎋 *पायनापल (अननस रोग)* 🎋

हा बुरशीमुळे होणारा रोग आहे. सेरॅटोसिस्टिम पॅराडॉंक्सा या बुरशीमुले उसावर हा रोग होतो. हा रोग प्रामुख्याने जमिनीद्वारे पसरतो. म्हणून ऊस लागवड झाल्यानंतर याचा प्रादुर्भाव आढळून येतो. क्वचितच जर उंदीरामुळे, किडीमुळे अथवा अवजारामुळे असास इजा झाली असेल तर ह्या रोगाचा प्रादुर्भाव उभ्या उसावर दिसून येतो. रोगजंतू इजा झालेल्या भागांवर शिरकाव करून उभ्या उसावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास रोगग्रस्त बेणे उगवत नाही. कारण रोगजंतू कांडीतील अन्नांश स्वत:साठी उपयोगात आणतात. त्यामुळे उगवणीवर विपरीत परिणाम होतो. प्रादुर्भाव झालेल्या ऊसाकांडीचे निरीक्षण केले असता कांडी वजनाला हलकी व करड्या रंगाची होऊन कुजलेल्या अवस्थेत दिसते. कांडीचे उभे दोन भाग केल्यास आतील भाग गडद लाल ते काळ्या रागाचा झालेला दिसतो. आतील तंतुमय भाग मोकळा होऊन कांडी पोकळ होते. कांडीवरील डोळे कुजतात. त्यामुळे उसाची उगवण होन नाही आणि उगवण झाली तर ते रोप जास्त काळ जगत नाही. उगवलेल्या उसात रोगाची तीव्रता वाढल्यास प्रथम पाने वाळतात व नंतर संपूर्ण रोप वळते. रोगट उसाचे कांड्याचा वास अननस फळाच्या वासासारखा येतो. म्हणून याला 'अननस रोग' म्हणतात. हा रोग मुख्यत्वेकरून खोलवर लागण केल्यास किंवा पाण्याचा निचरा होत नसलेल्या जमिनीत ऊस लागण केल्यास आढळतो.

*नियंत्रणाचे उपाय-*
१) निरोगी बेणे वापरावे.
२) लागवडीपूर्वी बेणे १०० ग्रॅम कार्बेन्डिझम बुरशीनाशक अथवा १०० ग्रॅम बेलेटॉंन बुरशीनाशक १०० लिटर पाण्यात मिसळून या द्रावणात १० मिनिटे बुडवून लागवड करावी.
३) उसाची खोल लागवड करू नये.
४) जमीन निचरायुक्त असावी.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------


🎋 *केवडा (लोह कमतरता)*  🎋

उसावरील केवडा हा रोग लोह या अन्नद्रव्याचे कमततेमुळे दिसून येतो. गावठाण किंवा पांढरीच्या जमिनीत तसेच पोयट्याच्या जमिनीत याचा प्रादुर्भाव प्रामुख्याने आढळतो. कारण अशा जमिनीत कॅल्शियम व मॅग्नेशियमयुक्त क्षाराचे प्रमाण अधिक असल्यामुळे लोह या अन्नद्रव्याची उपलब्धता कमी असते. त्यामुळे उसावर केवडा रोग दिसून येतो. रोगाचे सुरुवातीला उसाच्या शेंड्याकडील पाने पिवळी पडू लागतात. प्रथम पानाच्या शिराकडील भाग पिवळा पडतो. नंतर शिरांचा हिरवेपणा नष्ट होऊन संपूर्ण पान पिवळे होते. पीक निस्तेज दिसू लागते. प्रादुर्भाव तीव्र स्वरूपाचा असल्याने पाने पूर्णपणे पांढरट होतात आणि केवड्याच्या पानाप्रमाणे दिसू लागतात. रोगग्रस्त उसाची उंची कमी असते. खोडव्यामध्ये सुरूवातीपासून याचा प्रादुर्भाव होऊ शकतो.

*नियंत्रणाचे उपाय-*
१) हिरवळीची पिके घ्यावीत.
२) गंधकयुक्त खताचा वापर करवा.
३) चुनखडीयुक्त जमिनीत उसाची लागवड करू नये.
४) हेक्टरी २.५ किलो हिराकस (फेरस सल्फेट) ५०० लिटर पाण्यात मिळसून १० ते १२ दिवसांच्या अंतराने ३ ते ४ फवारण्या कराव्यात.
५) हिरवळीची पिके घ्यावीत. गंधकयुक्त खताचा वापर करावा.
६) उसाची लागवड चुनखडीच्या जमिनीत करू नये.
७) हेक्टरी १० किलो हिराकस कम्पोस्ट किंवा शेणखतात मिसळून लागवडीपूर्वी जमिनीत टाकावे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------


🎋 *तांबेरा* 🎋

हा रोग ‘पकसीनिया’ नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगाची प्रमुख लक्षणे हिवाळ्यात दिसतात. पानांवर तांबड्या रंगाचे पुरळ दिसतात व त्यातून लालसर धूरिकरण बाहेर पडतात.

*नियंत्रणाचे ऊपाय-*
१) ऊस पिकाला पाणी बेताने द्यावे व या रोगाचा प्रादूर्भाव झालेल्या पिकाचा खोडवा घेऊ नये.
२) या रोगाच्या नियंत्रणासाठी रोगप्रतिबंधक जातीची निवड करावी. उदा. को-६३१९८, को-७२१९.

📚 *संकलन -* कृषिसमर्पण समूह, महाराष्ट्र राज्य

*​​|| कृषिमूलम् जगत् सर्वम् ||​​*
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
🙏🙏   सदरील लेख व्हॉट्सप वरून कॉपी केला आहे  -🙏🙏

Friday, November 9, 2018

💟एक सुंदर बोध कथा💟


         *एक सुंदर बोध कथा...*

वाल्मिकी ऋषींनी 'रामायण " लिहून पूर्ण केले .त्यांनी ते देवर्षी नारदाना वाचायला दिले . नारदांनी ते वाचून सांगितले कि " हनुमान " रचित रामायण , हे तुमच्या रामायणा पेक्षा खूप सुंदर आणि भक्तिपूर्ण आहे. वाल्मिकी म्हणाले , " काय ? त्या माकडाने पण रामायण लिहिले आहे ? " वाल्मिकींना हे आवडले नाही. मग, कोणाचे रामायण चांगले आहे ? हि जिज्ञासा त्यांना स्वस्थ बसू देईना ..ते हनुमानाच्या शोधात फिरू लागले .
शोधता शोधता ते कर्दळी वनात, केळ्यांच्या बागेत आले . तेथील सात मोठ्या केळीच्या पानांवर रामायण कोरलेले त्यांनी पाहिले . त्यांनी ते संपूर्ण वाचले . त्यांनाही ते खूप भावले . अगदी योग्य शब्द , व्याकरण, व्याप्ती, भाषेचा ओघ, व ओघवती रसाळ भक्तिपूर्ण रचना ह्यांनी ते नटलेले होते. वाल्मिकींना ते सहनच झाले नाही . ते रडू लागले , ते स्वतःला आवरू शकले नाहीत.
"एवढे वाईट आहे का ?" हनुमानाने मागून विचारले. वाल्मिकी म्हणाले, " खूप सुंदर आहे ." हनुमान म्हणाले ," मग, तुम्ही का रडत आहात ? " वाल्मिकी म्हणाले ," आता, तुझे रामायण वाचल्यावर माझे रामायण कोणीही वाचणार नाही ".
हे ऐकल्यावर हनुमानाने ती सातही केळीची पाने फाडून टाकली ..चला, आता कोणीही हनुमानाचे रामायण वाचणार नाही .
हनुमान म्हणाले, माझ्या रामायणा पेक्षा तुम्हाला तुमच्या रामायणाची गरज आहे . जगात लोकांनी तुम्हाला वाल्मिकी म्हणून ओळखावे म्हणून तर तुम्ही रामायण लिहिले . माझे तसे नाही . मला माझा राम माझ्या सोबत सतत हवा म्हणून मी रामायण लिहिले .
त्याच क्षणी वाल्मिकींना जाणीव झाली कि मी एका हव्यासा पोटी रामायण लिहिले पण मला राम हा समजलाच नाही . मी एका इर्षेपोटी रामायण लिहित गेलो, ते सत्य जगाला सांगण्याच्या गुर्मीत रामाला विसरून गेलो. मी रामायण लिहिले ते माझ्या तल्या "मी" ला सुखावण्या साठी , ती माझी महत्वाकांक्षा  होती . हनुमानाने रामायण लिहिले ते त्याच्या " रामावरील भक्तिपोटी " . राम त्याचा सर्वस्व आहे आणि म्हणूनच ते जास्त सुंदर आहे .
" रामा " पेक्षा रामायण मोठे नाही. ज्याला राम कळला त्याला रामायण समजले कि नाही ह्याचा काहीच फरक पडत नाही .

*श्री राम जय राम जय जय राम ..!!!*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Copy from whatsapp
Copy from whatsapp
Copy from whatsapp

  

Top 18 Motivational Quotes

*मनापासून शांतपणे                    वाचा*                                                                      ★ जिथं आपली कदर नाही , तिथे कधीही जायचे नाही. ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो,त्यांची मनधरणी करत  बसायचे नाही. जे नजरेतून उतरले,त्यांच्या त्रास करून घायचा नाही.
   ★आपले हातून एखादयाचे काम होत असेल तर ते निस्वार्थी व निसंकोच करा. नेहमी मदत करा दुसर्याला त्रास होईल असे कदापी वागू नका.                                
     ★नेहमी स्वतः सोबत पैज लावा, जिंकलात तर  आत्मविश्वास' जिंकेल, आणि हरलात तर 'अहंकार' हरेल.

    ★पाण्याने भरलेल्या तलावात.मासे किड्यांना खातात, तर तोच तलाव कोरडा झाल्यास. किडे मास्यांना खातात..संधी सगळ्यांना मिळते.फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा...!
     ★ एखाद्या जवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्याच्याजवळ आपला विषय जरी निघाला तर.त्याच्या ओठांवर थोडंसं हसू आणि डोळ्यात थोडंसं पाणी नक्कीच आलं पाहिजे...!
        ★  तुम्ही स्वत:च्या खांद्यावर डोके टेकुन रडू शकत नाही आणि स्वत:च स्वत:ला आनंदाने मिठीही मारू शकत नाही...! आयुष्य म्हणजे दुस-यांसाठी जगायची बाब आहे...!      
             ★जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते आणि ते कोठे जमिनीवर नाहीं तर आपल्या मनात रुजवावे लागते..
     ★वादळे जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. वादळ महत्त्वाचे नसते. प्रश्न असतो कि आपण त्यांच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.      
         ★जगातील कुठलीच गोष्ट परिपुर्ण नाही.परमेश्वरानं सोनं निर्माण केलं. चाफ़्याची फ़ुलं सुद्धा त्यानंच निर्माण केली. मग त्याला सोन्याला चाफ़्याचा वास नसता का देता आला ? अपुर्णतेतही काही मजा आहेच की..
     ★दगडात मूर्ती असतेच. त्याचा फक्त नको असलेला भाग काढून टाकायचा असतो. आणि मग ह्याच भावनेने माणसाकडे पहा.  माणसातही नको असलेला भाग दूर करायला शिका.    
            ★जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक रहा. जेव्हा आर्थिक परिस्थती चांगली  असेल तेव्हा साधे रहा. जेव्हा एखादे पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील रहा. जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा शांत रहा.                      
      ★आपण हरवण्यासारखं आयुष्यात जरूर घडायला हवं , कारण अशा स्थळावरून परतताना माणूस 'माणूस' राहत नाही. परतून येतं ते चैतन्य!                  
        ★सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीचं सोनं करा.समुद्र हा सर्वांसाठीच सारखाच असतो . काहीजण त्यातून मोती काढतात तर काहीजण मासे काढतात तर काहीजण फक्त पाय ओले करतात.. हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे. फक्त तुम्ही त्यातून काय घेता हे महत्वाचे..
             ★तुम्ही कोणासाठी कितीही केले, तरी ते कोठेतरी कमीच पडते.​  ​कारण सत्य चप्पल घालून तयार होईपर्यंत , खोटं गावभर हिंडून आलेलं असतं.​
   
​    ★प्रेमळ माणसं तुम्हाला कधी वेदना देतीलही,​ पण त्यांचा उद्देश फक्त  तुमची
 काळजी घेणं हाच असतो.​

 ★जगातलं कटु सत्य हे आहे
की  "नाती" जपणाराच नेहमी सर्वांपासून दुरावला जातो​.
         
         ★नेहमी  लक्षात  ठेवा  की, 'मरण' कधीच  कुणालाच  चुकलेल नाही.आपल्या कडे असलेल्या संपत्तीचा बडेजाव करू नका. भरकटलेल्या जहाजात कितीही पैसा असला तरी पिण्याचे पाणी मिळत नाही. जमिनीशी जोडलेले राहा.
     ★ पदाचा, संपत्तीचा कधी गर्व करू नये. आयुष्य कितीही वैभवात काढले तरीही मयत त्याच मांजरपाट कपड्यात नेले जाते. *' कफन ब्रँडेड नही होता.'*


💥💣Copy from whatsapp 💥💣💥
                🙏🙏

Thursday, November 8, 2018

👍भाऊबीज (यमद्वितीया)👍

भाऊबीज (यमद्वितीया)
९ नोंव्हेंबर २०१८
----------------------------------------
या दिवशी मृत्यूची देवता यम आपल्या बहिणीकडे जेवायला जात असल्याने नरकातील जिवांना या दिवशी नरकयातना भोगाव्या लागत नाही, असे म्हटले जाते. तसेच या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. पुराणकाळापासून चालत आलेल्या या सणाबाबतची शास्त्रीय माहिती या लेखाच्या माध्यमातून करून घेऊया.

१. तिथी
कार्तिक शुद्ध द्वितीया



२. इतिहास
या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला; म्हणून या दिवसाला ‘यमद्वितीया’ असे नाव मिळाले.



३. महत्त्व
अ. यम हा सूर्यपुत्र आहे. या तिथीला यमामध्ये असणारा तमोगुण अल्प होऊन त्याच्यातील सत्त्व गुण वृद्धींगत होतो. त्यामुळे यमाचे उग्र आणि रौद्र रूप शांत होऊन तो सौम्य बनतो. यमाकडून लयकारी आणि विनाशकारी शक्ती प्रक्षेपित न होता स्थितीच्या कार्यासाठी पूरक असणारी धारिणी अन् पोषिणी या शक्तींचे प्रक्षेपण चालू होते.

या दिवशी यमाचे रूप सौम्य झाल्यामुळे त्याची तारक शक्ती कार्यरत असते. यम हा सूर्यपुत्र असून यमुना ही सूर्यपुत्री आहे. या तिथीला यम आणि यमुना हे भाऊ अन् बहीण एकमेकांना भेटून आनंद साजरा करतात. सूर्याच्या अंशापासून निर्माण झालेल्या यम आणि यमुना या दैवी शक्तींची सात्त्विक भेट प्रथम भूलोकात (पृथ्वीवर) होते अन् त्यानंतर ते माता-पिता सूर्यदेव आणि संध्या यांना भेटण्यासाठी सूर्यलोकात जातात. त्यामुळे त्यांच्याकडून प्रक्षेपित होणार्‍या सूर्याच्या सत्त्वप्रधान तेजोलहरी आणि मंगलकारी शक्ती ग्रहण करण्यासाठी पृथ्वीवर भाऊबीज साजरी केली जाते.

आ. अपमृत्यू येऊ नये म्हणून धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि यमद्वितीया या दिवशी मृत्यूची देवता ‘यमधर्म’ हिचे पूजन करतात.

आध्यात्मिक महत्त्व : कार्तिक मासात १२ आदित्यांपैकी पूषा हा आदित्य कार्यरत असतो. याचे तत्त्व आणि चैतन्य ग्रहण करता यावे यासाठी आदित्याचे सगुण रूप असणार्‍या सूर्याचे पूजन करणे योग्य आहे. यम हा सूर्यपुत्र असल्याने सूर्याचा प्रतिनिधी आणि धर्माचे प्रतीक म्हणून या दिवशी यमधर्माचे पूजन केले जाते. यमदेव प्रसन्न झाल्यामुळे जिवावर आलेले अपमृत्यूचे संकट दूर होते.

इ. ‘या दिवशी यमराज आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला जातो अन् त्या दिवशी नरकात पिचत पडलेल्या जिवांना त्या दिवसापुरते मोकळे करतो.’

आध्यात्मिक महत्त्व : या दिवशी यमाचे तारक रूप कार्यरत झाल्यामुळे त्याच्याकडून प्रक्षेपित होणार्‍या लयकारी तमप्रधान लहरींचे प्रक्षेपण उणावते. त्यामुळे नरकात पिचत पडलेल्या पापी जिवांना या दिवशी अत्यल्प प्रमाणात नरकयातना भोगाव्या लागतात. त्यामुळे यमद्वितीया हा नरकातील पापी जिवांसाठी आनंदाचा दिवस असतो.

र्इ. हा दिवस मातेच्या गर्भातून जन्म घेतलेल्या जिवांना एकमेकांविषयी वाटणारा जिव्हाळा व्यक्त करण्याचा दिवस आहे.

उ. या दिवशी जी बहीण आपल्या भावासाठी श्री यमाईदेवीकडे काही मागणे मागते, तिच्या भावानुसार ते भावाला मिळते. त्यामुळे तिचे भावाशी असलेले देवाण-घेवाण हिशोब काही प्रमाणात संपुष्टात येतात.

ऊ. या दिवशी स्त्री जिवात असलेले देवीतत्त्व जागृत होते आणि त्याचा भावाला लाभ होतो. भाऊ पूर्णवेळ साधना करणारा असेल, तर त्याला आध्यात्मिक लाभ होतो आणि तो साधना करणारा नसेल, तर त्याला व्यावहारिक लाभ होतो. भाऊ व्यवहार सांभाळून साधना करत असेल, तर त्याला आध्यात्मिक आणि व्यावहारिक लाभ ५०-५० टक्के होतो.



४. बहिणीने भावाला ओवाळल्याने भावावर होणारा परिणाम
भाऊ संत पातळीचा असेल, तर त्याच्या चेहर्‍याभोवती औक्षण केल्यास त्याचे आज्ञाचक्र जागृत होते. भाऊ चांगला साधक असेल, तर त्याला छातीपासून डोक्यापर्यंत ओवाळल्यास त्याच्या पातळीप्रमाणे त्याच्या षड्चक्रांतील एक चक्र जागृत होते. – श्री गणपति (कु. मेघा नकाते यांच्या माध्यमातून, ११.१०.२००५, दुपारी १२.२५)



५. सण साजरा करण्याची पद्धत
अ. यमतर्पण, यमदीपदान आणि यमाची प्रार्थना करणे
अपमृत्यू निवारणार्थ ‘श्री यमधर्मप्रीत्यर्थं यमतर्पणं करिष्ये ।’ असा संकल्प करून यमाच्या चौदा नावांनी तर्पण करावे. हा विधी पंचांगात दिलेला असतो. ‘याच दिवशी यमाला दीपदान करायचे असते. यम ही मृत्यू आणि धर्म यांची देवता आहे. ‘प्रत्येक माणसाला मरण आहे’, ही जाणीव सतत असणे आवश्यक आहे; कारण त्यामुळे माणसाच्या हातून वाईट कार्य वा धनाचा अपव्यय होणार नाही. तेव्हा यमाला दीपदान करून सांगायचे, ‘हे यमा, या दीपाप्रमाणे आम्ही सतर्क आहोत, जागरूक आहोत. जागरूकतेचे, प्रकाशाचे प्रतीक असलेला दीप तुला अर्पण करीत आहोत, त्याचा स्वीकार कर. तुझे आगमन केव्हा होईल, हे आम्हाला माहीत नाही; म्हणून आम्ही आमचा हिशोब वेळच्या वेळी ठेवतो, ज्यामुळे अर्धवट राहिलेल्याची चिंता करण्याची वेळ येत नाही; कारण आम्हाला माहीत आहे की, तू अचानक कधीही येऊ शकतोस.’

– प.पू. परशराम माधव पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

आध्यात्मिक महत्त्व :

यमतर्पण : या दिवशी धर्मराज, पितृपति, समवर्ति, प्रेतराज, कृतान्त, यमुनाभ्राता, शमन, काल, दण्डधर, श्राद्धदेव, वैवस्वत, अन्तक, यमधर्म आणि औदुंबर या १४ नावांचे (टीप १) उच्चारण करून यमतर्पण केल्यामुळे यमाच्या आधीन असणार्‍या अतृप्त पितरांना आणि मृतात्म्यांना गती मिळते. यमतर्पण करणार्‍या जिवाला यमाची कृपा लाभल्यामुळे त्याला भूत, प्रेत आणि पिशाच यांची बाधा होत नाही.

यमदीपदान : यमाला दीपरूपी अग्नीचा अंश अर्पण केल्याने त्याच्यातील तेजतत्त्व आणि सूर्याचा अंश जागृत होतात. त्यामुळे यमाची उग्रता उणावून सौम्यता, म्हणजेच सात्त्विकता वाढू लागतेे. त्यामुळे त्याची उपासना करणार्‍या जिवावर तो लवकर कृपावंत होतो.

यमाला प्रार्थना : धर्माचरणी आणि साधनारत असणार्‍या जिवांनी यमाला केलेल्या प्रार्थनेने तो प्रसन्न होतो आणि जिवाला यमपाश अन् यमदंड यांपासून अभय प्राप्त होते.

यमधर्माच्या कृपाशीर्वादामुळे यमतर्पण, यमदीपदान आणि यमाला प्रार्थना केल्यामुळे उपासकाला आयुष्य, आरोग्य अन् धर्मज्ञान यांची प्राप्ती होते.

याविषयी अधिक माहितीसाठी वाचा पुढील लेख, ‘यमतर्पण (यमदीपदान) करतांना १३ दिवे अर्पण का करावे ?’

आ. बहिणीने भावाला ओवाळणे
या दिवशी भावाने बहिणीकडे जावे आणि बहिणीने भावाला ओवाळावे. एखाद्या स्त्रीला भाऊ नसेल, तर तिने कोणाही परपुरुषाला भाऊ मानून त्याला ओवाळावे. ते शक्य नसल्यास चंद्राला भाऊ मानून ओवाळावे. `या दिवशी कोणत्याही पुरुषाने स्वतःच्या घरी पत्नीच्या हातचे अन्न घ्यायचे नसते. त्याने बहिणीच्या घरी जावे अन् तिला वस्त्रालंकार वगैरे देऊन तिच्या घरी भोजन करावे. सख्खी बहीण नसेल, तर कोणत्याही बहिणीकडे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीला भगिनी मानून तिच्याकडे जेवावे.’

आध्यात्मिक महत्त्व : या दिवशी धर्मशास्त्राने भावा-बहिणीचे नाते जोपासण्यावर विशेष भर दिलेला आहे. पुरुषाच्या मनात स्त्रीप्रती शुद्धभाव निर्माण होऊन चित्तावरील कामवासनेचा विकार न्यून व्हावा, हाच या मागील उद्देश आहे. ज्याप्रमाणे आईचे मुलावर असणारे प्रेम निर्मळ असते, तसेच बहिणीचेही भावावरील प्रेम पवित्र असते. या प्रेमाची देवाण-घेवाण होऊन एकमेकांविषयीचा कृतज्ञताभाव जागृत होण्यासाठी भाऊ आणि बहीण भाऊबीज साजरी करतात.

सौजन्यः- सनातन संस्था
माहिती संकलन. श्री दीपक कुळकर्णी.

Monday, November 5, 2018

🤔पैसा गाडी बांगला म्हणजे ,, ,,,,,,,,🤔🤔🤔

पैसा गाडी बांगला म्हणजे गुरु कृपा नव्हे...

आयुष्यात येणारे अनेक संकटे
आपल्या नकळत टळून जातात
ते टळलेले संकट म्हणजे  गुरु कृपा...

गाडीवरून जाताना कुणाचा धक्का लागून पडता पडता आपण स्वतःला सावरतो
ते सावरणे म्हणजे   गुरु कृपा...

एकवेळचे जेवणाचे वांदे असताना
मिळालेले दोन वेळच पोटभर जेवण म्हणजे  गुरु कृपा...

कोसळलेल्या दुःख रुपी डोंगराला
पेलण्याची जी ताकत आपल्यात निर्माण होते, ती ताकत म्हणजे  गुरु  कृपा...

'आता सर्व संपलं' अस वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते
ती उमेद म्हणजे  गुरु कृपा...

आडचणीमध्ये सर्व साथ सोडून गेले असता "तू लढ.. आम्ही आहोत सोबत" हे गुरुबंधू चे शब्द म्हणजे  गुरु कृपा...

प्रसिद्धी च्या शिखरावर असतांना
तेथूनच हवेत ना उडता पाय जमिनीवर ठेवणे म्हणजे  गुरु कृपा....

पैसा, गाडी, बंगला मिळणे म्हणजे सद्गुरू कृपा नव्हे
ते नसताना आयुष्यात असलेले
' समाधान ' म्हणजे  गुरु कृपा....🙏🏻
💟💟  Copy from whatsup💟💟


 Vivek Patil 

💟💟धर्म का परिहासः जिम्मेदार कौन-3🤔🤔

💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟


धर्म का परिहासः जिम्मेदार कौन-3
शिवलिंग पर दूधः रुद्राभिषेक से क्राइम कंट्रोल भी किया जा सकता है

सभी अपनों को राम राम
धर्म के विद्वान कहते हैं कि शिवलिंग पर दूध या जल चढ़ाने से भगवान शिव खुश हो जाते हैं. वे इसके प्रमाण के तौर पर शास्त्रों में लिखे श्लोकों को पढ़कर सुनाते हैं. जो भक्तिधारा से जुड़े हैं वे इसे तुरंत मान लेते हैं.
मगर धर्म का मला भेटलेली एक सुंदर स्त्री! उड़ा रहे तर्कशास्त्री इसे नही मानते. वे इस बात से चिंतित नजर आते हैं कि हर दिन शिवलिंग पर हजारों लीटर दूध चढ़ाकर बर्बाद कर दिया जाता है. उसे गरीबों को दे दिया जाये तो उनका पोषण हो जाएगा. उनका तर्क है कि जिसके नाम पर लाखों लीटर दूध नीलियों में बहा दिया जाये वो कैसा भगवान.
कल हमने शिवलिंग पर दूध चढ़ाने के वैज्ञानिक पक्ष पर चर्चा की.
जिसके मुताबिक शिवलिंग पर दूध चढ़ाना भगवान की डिमांड नही है. बल्कि लोग इससे अपने शरीर के पंच तत्वों को उपचारित करते हैं.
जो लोग शिवलिंग पर दूध चढ़ाने जाते हैं उनसे बात करें तो 90 प्रतिशत से अधिक वे लोग हैं जिन्हें एेसा करने के लिये किसी ज्योतिषी, तांत्रिक, गुरु, पुजारी, वास्तुविद ने कहा होता है. ताकि उन पर आई समस्यायें दूर हो जायें.
उर्जा विज्ञान के मुताबिक इथरिक बाड़ी अर्थात सूक्ष्म शरीर अर्थात् आभामंडल से नकारात्मकता हटा दी जाये तो समस्यायें खुद ही खत्म होने लगती हैं. क्योंकि सभी समस्याओं का कारण नकारात्मक उर्जायें ही होती हैं.
शिवलिंग पर अभिषेक से नकारात्मक उर्जायें कैसे हटती हैं. इस पर हमने कल बात की. कोई भी इसे कभी भी वैज्ञानिक तौर पर प्रमाणित कर सकता है.
मगर कुछ लोगों ने इस पर आपत्ति दर्शाते हुए कहा है कि मै धर्म की बातों का अपभ्रंश कर रहा हूं. शिवलिंग की सेवा से भगवान शिव खुश होकर आशीर्वाद देते हैं, जिससे दुख दूर होते हैं. बस इसके अलावा दूसरी कोई सच्चाई नही है.
मै उनके भक्ति भाव को प्रणाम करता हूं.
मगर इससे धर्म का मजाक उड़ाने वाले संतुष्ट नही होते. वे कहेंगे साबित करो कि शिवलिंग पर दूध चढ़ाने से भगवान शिव खुश हुए.
वैज्ञानिक तौर पर इसे साबित नही किया जा सकता.
लेकिन ये हर बार साबित किया जा सकता है कि इससे तन-मन से नकारात्मकता हटती है.

धर्म के जानकार शास्त्रों के हवाले से कहते हैं कि शिवाभिषेक से पाप कटते हैं.
हम भी इसी बात को ही कह रहे हैं.
कालांतर में नकारात्मकता को पाप और उसके नतीजों को दुख कहा जाता था.
वास्तव में शिवलिंग पर दूध या जल नकारात्मकता हटाने के लिये ही चढ़ाया जाता है.
इसी रूप में इसकी व्याख्या की जाये तो कोई वजह नही कि तर्क करने वाले बात को न समझें.
ये कहना बिल्कुल उचित नही है कि भगवान शिव को खुश करने के लिये दूध चढ़ाया जाता है.
यही बात है जो भ्रम को बढ़ावा देती है.
जान लीजिये कि भगवान शिव की सेवा में कामधेनु गाय है. जो लगातार दूध की नदियां बहाने में सक्षम है. क्या कोई उससे अधिक या उससे उत्तम दूध शिवजी को दे सकता है.
जवाब होगा नही.
तो फिर बेजुबान बच्चों से छीनकरर निकाले गये दूध में भगवान अपनी खुशी का इंतजार क्यों करेंगे.
ध्यान दें गाय हो या भैंस सभी में दूध उनके बच्चों के पीने के लिये बनता है. हम उनके हिस्से का दूध छीनकर अपने उपयोग में लाते हैं.
इसी तरह शिवजी के सिर पर गंगाजी विराजमान हैं. क्या कोई उनसे अधिक जल या उनसे पवित्र जल शिव जी पर चढ़ा सकता है.
जवाब होगा नही.
तो फिर वे हमारे एक लोटा जल में अपनी खुशी क्यों ढ़ूंढेंगे.
यहां ये कह देना भी उचित नही हैं कि भगवान सिर्फ भाव के भूंखें हैं. अगर भाव के भूखें हैं तो दूध क्यों चढ़ाया जाये. सिर्फ भाव ही अर्पित कर दिये जायें.
स्पष्ट है कि शिव जी की खुशी नाखुशी का शिवलिंग पर चढ़ने वाले दूध-पानी से कोई ताल्लुक नही.
भक्ति भाव से प्रभावित लोग अपने दुख यानि समस्यायें दूर करने के लिये शिवलिंग पर दूध चढ़ाते हैं. कहीं नही कहा जाता कि शिवलिंग पर दूध चढ़ाने से सद्गति प्राप्त होगी. सभी सलाह देते हैं कि शिवलिंग पर दूध चढ़ाने से कष्ट कटेंगे.
अर्थात यह दुख दूर करने या कष्ट काटने का उपचार है न कि शिव जी को खुश करने का तरीका.
शिव बाबा हैं. बाबा मतलब बुजुर्ग. वे सारे संसार के बाबा हैं. हम सब उनकी संतानें हैं. इस नाते जब हम सफल और खुश होते हैं तो वे भी खुश हो जाते हैं. क्योंकि अपनी संतानों को खुश देखकर कोई भी खुश होता है. शिवलिंग पर चढ़ाई जाने वाली वस्तुवें हमारे भीतर की नकारात्मकता लेकर शिवलिंग पर चली जाती हैं. शिवलिंग उन्हें पाताल अग्नि में भेजकर नष्ट कर देते हैं. जिससे सेहत और सफलता के रास्ते खुलते हैं. मन खुश होता है. शिव बाबा के खुश होने का इससे बड़ा कारण कुछ हो ही नही सकता.
कोई भी बुजुर्ग अपने परिवार के सदस्यों को खुश देखकर प्रशन्न हो ही जाता है.

धर्म के जानकारों से मेरा विनम्र अनुरोध है कि वे शास्त्रों का मर्म सामने लायें न कि मात्र कहानियां. कहानियां तो अध्यात्म के मर्म को समझाने के लिये उदाहरण स्वरूप लिखी गईं.
जिन्हें मेरी बातों पर संसय है मै उनके साथ वैज्ञानिक शास्त्रार्थ करने को तैयार हूं.
वे अपनी बात सिद्ध करें. मै अपनी बात प्रमाणित कर दूंगा.

इस तरह के विवाद सामूहिक उपचार की महान विद्या रुद्राभिषेक की स्वीकारोक्ति प्रभाविथ कर रहे हैं.
भगवान विष्णु भी अपनी बिगड़ी बनाने के लिये शिवार्चन का सहारा लेते हैं. जिन्हें खुद ही दुख हर्ता कहा जाता है.
रुद्राभिषेक से कई किलोमीटर तक की उर्जाओं को ठीक किया जा सकता है.
कोई प्रयोग करना चाहे तो कभी भी कर ले.
एक एेसा थाना क्षेत्र लीजिये जिसमें अपराध का ग्राफ काफी ज्यादा हो. वहां विधान के मुताबिक कुछ समय तक भाव परिवर्तन रूद्राभिषेक करायें जायें. थाने का रिकार्ड बताएगा कि क्षेत्र में अपराध का ग्राफ उल्लेखनीय रूप से नीचे आ रहा है.
मैने इस प्रयोग को हमेशा सटीक पाया है.
कुछ लोग तुरंत कहेंगे कि कई मंदिर में तो अनवरत रुद्राभिषेक होते हैं, फिर उन क्षेत्रों में अपराध कम क्यों नही होता.
जवाब है कि वहां भाव परिर्तन का संकल्प नही लिया जाता. वे रुद्राभिषेक व्यक्तिगत संकल्पों के साथ किये जाते हैं.
जिनके मन में इस बात पर सवाल उठ रहे हैं उनसे आग्रह है कि बहस छोड़कर कर्मयोगी बनें. इसे करके देखें. इससे पहले कुछ न कहें.

रुद्राभिषेक में कई वस्तुओं का उपयोग किया जाता है. सब अलग अलग नकारात्मकता को हटाती हैं.
उनमें कुछ चीजों को लेकर लोग सोचते हैं कि शिव जी को नशा पसंद है. एेसा बिल्कुल नही है. वे वस्तुवें उपचार के उपकरण जैसा काम करती हैं.
जैसे भांग की उर्जा शरीर के सेल्स की प्राकृतिक सफाई करती है. जिससे कैंसर का खतरा समाप्त होता है. कई देशों में भांग से कैंसर का इलाज शुरू हो चुका है.
गांजा की उर्जायें स्वांस नली और फेंफड़ों की उर्जाएं साफ करने में सक्षम है. दमें का दौरा कई बार जानलेवा होता है. जिसको दौरा पड़ा है उसके मुंह या नाक के द्वारा उसकी सांस नलियों में गांजा का धुवां भर देने से राहत मिल जाती है.
यहां हम इन वस्तुओं की उर्जाओं की प्राकृतिक क्षमता के बारे में बात कर रहे हैं. उनके सेवन की नही. यदि कोई इनका औषधीय उपयोग करना चाहे तो सक्षम चिकित्सक की सलाह से ही करे.
रुद्राभिषेक में कुश का जल उपयोग किया जाये तो रोग मुक्ति होती है. कुश की उर्जायें रोम रोम नकारात्मकता हटाने में सक्षम होती हैं. इसी कारण धार्मिक कार्यों में इसका बहुत उपयोग होता है.
शहद, गन्ने के रस और चीनी की उर्जायें मूलाधार चक्र को साफ करती हैं. इसलिये इन्हें समृद्धि हेतु रुद्राभिषेक में लिया जाता है.
एेसे ही शिवाभिषेक, शिवार्चन या रुद्राभिषेक में इश्तेमाल की जाने वाली हर वस्तु शोधनकारी होती है.
इनमें से तरल पदार्थों को प्रसाद के रूप में ग्रहण न करें. जो वस्तुवें ठोस हैं वे जलहरी में प्रवाहित न होने के कारण नकारात्मकता ग्रहण नही करतीं. उन्हें प्रसाद के रूप में ले सकते हैं.
आगे हम कौन कौन सा प्रसाद हानिकारक होता है. उसे ग्रहण करने से क्यों समस्यायें बढ़ जाती हैं. इस पर चर्चा करेंगे.
तब तक की राम राम
हर हर महादेव.
Ram ram shiv sharanam


    💟.   यह लेख Facebook से copy किया है 💟
💟💟अधिक जानकारी के
लिए   https://shivsadhak.com. पर जा सकते हो
💟Ram ram shiv sharanam 💟

💞मला भेटलेली एक सुंदर स्त्री!💞

                     

🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗  

         💟💟 Most motivational story 💟💟


                  कुठल्याही परिस्थितीत सकारात्मक कसं राहायचं ???
हे वाचा... आयुष्यात परत कधीही नकारात्मक विचार मनातसुद्धा येणार नाही.

मला भेटलेली एक सुंदर स्त्री!
---------------------------------------------
एका संध्याकाळी सगळी कामं आटोपुन मंदिराबाहेरील एका आडबाजुच्या बाकड्यावर बसलो होतो, अंधार पडत चालला होता, वर्दळही फारशी नव्हती. घरी जायच्या आधी कोणाचे काही कॉल्स, व्हॉट्स अप बघावं म्हणुन मोबाईल काढला.... बघतो तो हँग झालेला... बापरे बरेच महत्त्वाचे कॉल्स आता कसे करायचे? मोबाईल चालु करण्याचा खटाटोप चालु झाला... वैताग आला... मोबाईल काही सुरु होईना ....

काय करावं या विचारांच्या तंद्रीत असतांनाच खांद्यावर कुणीतरी हात ठेवला आणि घोगर्या आवाजात कुणीतरी विचारलं, कोण हाय ...? मी तंद्रीतुन जागा होत एकदम दचकलो आणि वर पाहिलं तर बघुन भिती वाटावी अशा विचित्र चेहऱ्याची एक बाई शेजारी उभी....

आधी घाबरलो पण नंतर चिडुन विचारलं , काय बाई हि काय पद्धत आहे का ? दिसतंय का नाही तुला ? फटकन येवुन अशी अंगावर हात ठेवतेस ... घाबरलो ना मी...!

तशी म्हणाली, आवो मला दिसत नाय, हितंच मी भायेर भीक मागती, या टायमाला मी हितंच बसुन भाकर खाती... मापी करा, मी जाती दुसरीकडं ... मी ओशाळलो, म्हटलं, नाही बाई बसा इथंच , मी चाललोच आहे...

तिला बघुन अंगातला डॉक्टर जागा झाला, म्हणालो डोळे कशानं गेले? म्हणाली, लहानपणी डोळ्यातनं पाणी येत व्हतं लइ दुकायचे डोळे, आयबापानं गावातल्या भगताला दाखवलं, त्यांनं कायतरी औशद सोडलं डोळ्यात , मरणाची आग झाली, नंतर डाक्टर म्हणला कसलंतरी अॕशीड व्हतं ते, डोळं आतुन जळल्यात , तवापासुन दिसणंच बंद झालं, 17 वर्साची व्हते मी तवा....

अरेरे ! तुमच्या आईबापाच्या आणि भगताच्या चुकीमुळं डोळे गेले तुमचे , आधीच ते डॉक्टरांकडे गेले असते तर हि वेळ नसती आली... बेअक्कल असतात लोकं... मी सहज बोलुन गेलो. यावर मला वाटलं माझ्याच सुरात सुर मिसळुन ती आता त्यांना शिव्या शाप देईल, पण नाही, ती म्हणाली, नाय वो कुनाच्या आयबापाला वाटंल आपल्या तरण्या पोरीचं डोळं जावं म्हणुन ? बिचाऱ्यानी त्यांना जे जमलं ते केलं... खेड्यात कुटनं आनायचा डाक्टर ? आणी आला तरी त्याला पैसं कुटनं दिलं आस्त ? माजं डोळं गेल्यावर डोकं आपटुन आपटुन माजा बाप गेला ...त्या बिचाऱ्याची काय चुक व्हती? माज्या आईनं, एकाद्या लहान बाळावानी माजं सगळं केलं... डोळं आसताना जेवडी माया नाय केली त्याच्या पेक्षा जास्त माया तीनं डोळं गेल्यावर केली.. मी चांगली आसते तर येवडी फुलावानी जपली आसती का मला ? डोळं गेल्याचा आसाबी फायदा आसतुया ... हसत म्हणाली...

वाईटातुन सुद्धा किती चांगलं शोधण्याचा प्रयत्न करत होती हि बाई ?

तरी मी म्हणालो, मग भगताचं काय ... ? त्यांनं तर चुकीचं औषध सोडलं ना ?

म्हणाली, आसं कसं म्हणता सायेब, माजं डोळं काय मुद्दाम घालवलं का त्यानं ? आवो मला ते औशद लागु न्हाई झालं त्याला त्यो तरी काय करणार ? आवो माजं डोळं जाणारंच होतं, त्याला त्यो निमित्त झाला फक्त ... माज्या नशीबाचे भोग हुते ते ... त्या बिचाऱ्याचा दोष न्हाई... कुणी काही चांगलं करायला गेलं आन चुकुन वाईट झालं तर त्याला दोष देवु नाई... !
डाक्टर सुई टोचतो, पण बरं वाटावं म्हणुनच ना? त्याचा दुखवायचा इचार नसतो त्यात... आपुन आसं समजुन घेतलं तर कुणाचा राग कशाला येईल...?
Intention is important behind every action या वाक्याचा सार या बाईने किती सहज सांगीतला ...!!!

पण आज्जी इतकी वर्षे तुम्ही काहिही न बघता कशा राहु शकला?

म्हणाली, न बघता? काय बघायचं राहिलंय ... आवो सगळं बगुन मनात साटवलंय .... वासराला दुध पाजताना गाईचं डोळं म्या पाहिलेत, सगळा भात माज्या ताटात टाकुन उपाशी हासत झोपणारी आई म्या पाह्यलीय, पिल्लाच्या चोचीत घास भरवणारी चिमणी म्या बगीतली, कुत्र्याच्या पिल्लाला दुध पाजणारी शेळी म्या बगीतली, फुटलेल्या छपरातनं आत येणारं चांदणं म्या बगीतलंय, मातीतनं उगवणारा कोंब म्या पाह्यलाय .... तुमी काय बगीतलं ह्यातलं ...? आवो ह्ये सगळं बगुन झाल्यावर राह्यलंच काय बगायला ?

तीच्या प्रश्नाला उत्तर नव्हतं माझ्याकडे !

आज्जी तुमचं लग्न ....? चाचरत मी विचारलं... आज्जी म्हणाली, झालं हुतं की, त्यो बी आंदळा हुता, त्यानंच आणलं पुण्याला मला .... पदरात एक पोरगी टाकली, त्याच्या पुण्याईनं पोरगी आंदळी नव्हती ... म्हणलं चला चांगलं दिवस आलं ... पन त्योबी दोन वर्षातच गेला...... बरं झालं बिचारा त्यो तरी सुटला.... !

आणि आज्जी तुमची पोरगी ? ती कुठाय ? आज्जी भकास हसली,म्हणाली, तीच्या विसाव्या वर्षी ती गेली तीच्या बापामागं त्याला शोधायला ... आता दोगं वरनं माजी मजा बगत आसतील .... स्वर्गात म्हणं नाचगाणी चालत्यात रोज, पन आमच्या आंदळ्याच्या नशीबात ते बी न्हाई मेल्यावर सुदा..... असं म्हणुन आज्जी हसायला लागली...

पण मी सुन्न झालो, काय बोलावं हेच कळेना.... इतकं सगळं भोगुनही हि इतकी निर्विकार !

आज्जी, या सगळ्यात दोष कुणाचा ?

कुणाचाच न्हाई, परत्येकानं आपापलं काम केलं, ज्याचा त्याचा मोबदला ज्याला त्याला मिळाला... आपल्या वाट्याला आलं ते घ्यायचं, का आन कसं ते इचारायचं न्हाइ... भाकर मिळाली तर म्हणायचं आज आपली दिवाळी, ज्या दिवशी मिळणार न्हाई म्हणायचं, चला आज उपास करु....
दोष कुनाला द्यायचा न्हाई... वाईटात बी चांगलं शोधलं तर माणसाला वाईट वाटायचं काहि कारणच नाही...

ते कसं आज्जी मला नाही समजलं ...

ह्ये बगा सायेब, एकाद्याचा हात जरी तुटला तरी त्यानं म्हणावं, एकच हात तुटलाय , दुसरा तरी हाय चांगला, दोनी हात गेलं तरी म्हणावं पाय तरी हायेत माजे आजुन... आता माजं बगा, दोनी डोळं गेलं तरी बोलता येतंय ना मला ???

काय बोलावं मलाच कळेना, या विद्रुप चेहऱ्यामागे किती विद्वत्ता दडली होती ? वयामुळं हा पोक्तपणा आला असेल कि, भोगलेल्या सर्व यातनांमुळे मनाला आलेला हा बधीरपणा असेल ?

काहिही असो एव्हढ्या सुंदर विचाराची, वाईटातुन चांगलंच शोधण्याचा प्रयत्न करणारी, वरवर विचित्र दिसणारी आजी तेव्हा मला जगातली सर्वात सुंदर स्त्री भासली !!! -(दुःखातही सूखी होता ती)
                  कुठल्याही परिस्थितीत सकारात्मक कसं राहायचं ???
हे वाचा... आयुष्यात परत कधीही नकारात्मक विचार मनातसुद्धा येणार नाही.

                               मला भेटलेली एक सुंदर स्त्री!
                             ---------------------------------------------
एका संध्याकाळी सगळी कामं आटोपुन मंदिराबाहेरील एका आडबाजुच्या बाकड्यावर बसलो होतो, अंधार पडत चालला होता, वर्दळही फारशी नव्हती. घरी जायच्या आधी कोणाचे काही कॉल्स, व्हॉट्स अप बघावं म्हणुन मोबाईल काढला.... बघतो तो हँग झालेला... बापरे बरेच महत्त्वाचे कॉल्स आता कसे करायचे? मोबाईल चालु करण्याचा खटाटोप चालु झाला... वैताग आला... मोबाईल काही सुरु होईना ....

काय करावं या विचारांच्या तंद्रीत असतांनाच खांद्यावर कुणीतरी हात ठेवला आणि घोगर्या आवाजात कुणीतरी विचारलं, कोण हाय ...? मी तंद्रीतुन जागा होत एकदम दचकलो आणि वर पाहिलं तर बघुन भिती वाटावी अशा विचित्र चेहऱ्याची एक बाई शेजारी उभी....

आधी घाबरलो पण नंतर चिडुन विचारलं , काय बाई हि काय पद्धत आहे का ? दिसतंय का नाही तुला ? फटकन येवुन अशी अंगावर हात ठेवतेस ... घाबरलो ना मी...!

तशी म्हणाली, आवो मला दिसत नाय, हितंच मी भायेर भीक मागती, या टायमाला मी हितंच बसुन भाकर खाती... मापी करा, मी जाती दुसरीकडं ... मी ओशाळलो, म्हटलं, नाही बाई बसा इथंच , मी चाललोच आहे...

तिला बघुन अंगातला डॉक्टर जागा झाला, म्हणालो डोळे कशानं गेले? म्हणाली, लहानपणी डोळ्यातनं पाणी येत व्हतं लइ दुकायचे डोळे, आयबापानं गावातल्या भगताला दाखवलं, त्यांनं कायतरी औशद सोडलं डोळ्यात , मरणाची आग झाली, नंतर डाक्टर म्हणला कसलंतरी अॕशीड व्हतं ते, डोळं आतुन जळल्यात , तवापासुन दिसणंच बंद झालं, 17 वर्साची व्हते मी तवा....

अरेरे ! तुमच्या आईबापाच्या आणि भगताच्या चुकीमुळं डोळे गेले तुमचे , आधीच ते डॉक्टरांकडे गेले असते तर हि वेळ नसती आली... बेअक्कल असतात लोकं... मी सहज बोलुन गेलो. यावर मला वाटलं माझ्याच सुरात सुर मिसळुन ती आता त्यांना शिव्या शाप देईल, पण नाही, ती म्हणाली, नाय वो कुनाच्या आयबापाला वाटंल आपल्या तरण्या पोरीचं डोळं जावं म्हणुन ? बिचाऱ्यानी त्यांना जे जमलं ते केलं... खेड्यात कुटनं आनायचा डाक्टर ? आणी आला तरी त्याला पैसं कुटनं दिलं आस्त ? माजं डोळं गेल्यावर डोकं आपटुन आपटुन माजा बाप गेला ...त्या बिचाऱ्याची काय चुक व्हती? माज्या आईनं, एकाद्या लहान बाळावानी माजं सगळं केलं... डोळं आसताना जेवडी माया नाय केली त्याच्या पेक्षा जास्त माया तीनं डोळं गेल्यावर केली.. मी चांगली आसते तर येवडी फुलावानी जपली आसती का मला ? डोळं गेल्याचा आसाबी फायदा आसतुया ... हसत म्हणाली...

वाईटातुन सुद्धा किती चांगलं शोधण्याचा प्रयत्न करत होती हि बाई ?

तरी मी म्हणालो, मग भगताचं काय ... ? त्यांनं तर चुकीचं औषध सोडलं ना ?

म्हणाली, आसं कसं म्हणता सायेब, माजं डोळं काय मुद्दाम घालवलं का त्यानं ? आवो मला ते औशद लागु न्हाई झालं त्याला त्यो तरी काय करणार ? आवो माजं डोळं जाणारंच होतं, त्याला त्यो निमित्त झाला फक्त ... माज्या नशीबाचे भोग हुते ते ... त्या बिचाऱ्याचा दोष न्हाई... कुणी काही चांगलं करायला गेलं आन चुकुन वाईट झालं तर त्याला दोष देवु नाई... !
डाक्टर सुई टोचतो, पण बरं वाटावं म्हणुनच ना? त्याचा दुखवायचा इचार नसतो त्यात... आपुन आसं समजुन घेतलं तर कुणाचा राग कशाला येईल...?
Intention is important behind every action या वाक्याचा सार या बाईने किती सहज सांगीतला ...!!!

पण आज्जी इतकी वर्षे तुम्ही काहिही न बघता कशा राहु शकला?

म्हणाली, न बघता? काय बघायचं राहिलंय ... आवो सगळं बगुन मनात साटवलंय .... वासराला दुध पाजताना गाईचं डोळं म्या पाहिलेत, सगळा भात माज्या ताटात टाकुन उपाशी हासत झोपणारी आई म्या पाह्यलीय, पिल्लाच्या चोचीत घास भरवणारी चिमणी म्या बगीतली, कुत्र्याच्या पिल्लाला दुध पाजणारी शेळी म्या बगीतली, फुटलेल्या छपरातनं आत येणारं चांदणं म्या बगीतलंय, मातीतनं उगवणारा कोंब म्या पाह्यलाय .... तुमी काय बगीतलं ह्यातलं ...? आवो ह्ये सगळं बगुन झाल्यावर राह्यलंच काय बगायला ?

तीच्या प्रश्नाला उत्तर नव्हतं माझ्याकडे !

आज्जी तुमचं लग्न ....? चाचरत मी विचारलं... आज्जी म्हणाली, झालं हुतं की, त्यो बी आंदळा हुता, त्यानंच आणलं पुण्याला मला .... पदरात एक पोरगी टाकली, त्याच्या पुण्याईनं पोरगी आंदळी नव्हती ... म्हणलं चला चांगलं दिवस आलं ... पन त्योबी दोन वर्षातच गेला...... बरं झालं बिचारा त्यो तरी सुटला.... !

आणि आज्जी तुमची पोरगी ? ती कुठाय ? आज्जी भकास हसली,म्हणाली, तीच्या विसाव्या वर्षी ती गेली तीच्या बापामागं त्याला शोधायला ... आता दोगं वरनं माजी मजा बगत आसतील .... स्वर्गात म्हणं नाचगाणी चालत्यात रोज, पन आमच्या आंदळ्याच्या नशीबात ते बी न्हाई मेल्यावर सुदा..... असं म्हणुन आज्जी हसायला लागली...

पण मी सुन्न झालो, काय बोलावं हेच कळेना.... इतकं सगळं भोगुनही हि इतकी निर्विकार !

आज्जी, या सगळ्यात दोष कुणाचा ?

कुणाचाच न्हाई, परत्येकानं आपापलं काम केलं, ज्याचा त्याचा मोबदला ज्याला त्याला मिळाला... आपल्या वाट्याला आलं ते घ्यायचं, का आन कसं ते इचारायचं न्हाइ... भाकर मिळाली तर म्हणायचं आज आपली दिवाळी, ज्या दिवशी मिळणार न्हाई म्हणायचं, चला आज उपास करु....
दोष कुनाला द्यायचा न्हाई... वाईटात बी चांगलं शोधलं तर माणसाला वाईट वाटायचं काहि कारणच नाही...

ते कसं आज्जी मला नाही समजलं ...

ह्ये बगा सायेब, एकाद्याचा हात जरी तुटला तरी त्यानं म्हणावं, एकच हात तुटलाय , दुसरा तरी हाय चांगला, दोनी हात गेलं तरी म्हणावं पाय तरी हायेत माजे आजुन... आता माजं बगा, दोनी डोळं गेलं तरी बोलता येतंय ना मला ???

काय बोलावं मलाच कळेना, या विद्रुप चेहऱ्यामागे किती विद्वत्ता दडली होती ? वयामुळं हा पोक्तपणा आला असेल कि, भोगलेल्या सर्व यातनांमुळे मनाला आलेला हा बधीरपणा असेल ?

काहिही असो एव्हढ्या सुंदर विचाराची, वाईटातुन चांगलंच शोधण्याचा प्रयत्न करणारी, वरवर विचित्र दिसणारी आजी तेव्हा मला जगातली सर्वात सुंदर स्त्री भासली !!!


(सदर लेख व्हॉट्सप वरून कॉपी पेस्ट केला आहे )

🤗🤗*तुम्ही मांसाहार का करता??*🤗🤗

*तुम्ही मांसाहार का करता??*

१) *शक्ती साठी*

-- पण जमिनीवरचा सगळ्यात शक्तीशाली प्राणी हत्ती शाकाहारी आहे.
तो कधी ताकदीसाठी मांस भक्षण करित नाही!!
शेतकय्रांचा सोबत राबराब राबणारा बैल कधी मांसाहार करतो का?

*अश्वशक्ती*(होर्सपाँवर) ने कुठल्याही यंत्राची शक्ती मोजल्या जाते अश्व-घोडा कधी मांसाहार करतो का?

मग मांसाहार केल्यानेच  शक्ती मिळते असे कसे म्हणता येईल?

२) *जीभेवरच्या चवीसाठी*??

*मांसाला कसली आलीय चव.*
चव सगळी त्यातल्या अष्टपैलू मसाल्यांना.
तेच मसाले वापरले तर वांग्या बटाट्याच्या भाजीलाही येईलच की चव!

३) *जीवनसत्वांसाठी*??

--मांसापेक्षा हिरव्या पालेभाज्या आणि सूकामेव्यात कितीतरी अधिक प्रथिने जीवनसत्वे अन् पौष्टिक पदार्थ असतात.हो ना?

मग मांसाहार कशासाठी?

खरे तर निसर्गाने

ना आपले दात मांस चावण्यायोग्य बनवलेत

ना आतडे मांस पचविण्या योग्य बनवलेत.

मानवी शरीरचनाच मूलत:
शाकाहार पूरक अशीच आहे.

असे नसते तर छोट्या बालकाला भाताच्या पेजेऐवजी मांसाचे तुकडे कुस्करून द्यायला सांगितले असते डॉक्टरांनी
याचा अर्थच हा आहे
की
माणूस नैसर्गिक मांसाहारी प्राणी नाही!

मग
का बळेच रक्त चाटवायचं जिभेला?

*वैद्यकशास्त्र* सांगते,मांसाहारातून पचनसंस्थेचे विकार जडतात.
मानसिक अस्वास्थ्य निर्माण होते ज्यातून पुढे अनेक व्याधी निर्माण होऊ शकतात.

*अध्यात्मशास्त्र*    सांगते,मांसाहारामुळे काम,क्रोध,मद,मत्सर इ.
दुर्गुण माणसात प्रबळ होतात.
आणी असुरी प्रवृत्ती वाढते.

असं म्हणतात
वानरापासून मानव ऊत्क्रांत झाला.
वानर आजही शाकाहारी आहे.
ऊत्क्रांतीच्या प्रवासात

वानरापासून नर होताना
माणूस जानवर
कसा झाला कुणास ठाऊक?

पण माणसाचे पोट म्हणजे जनावरांची दफनभूमी नव्हे
एवढे मात्र माणसाने लक्षात घेतले पाहीजे!!!शुद्ध आहार शाकाहार निसर्ग निर्मिती अशी आहे जो प्राणी ओठाने पाणी पितो त्याने शाकाहार करावा आणि जो प्राणी जिभेने पाणी पितो त्याने मांसाहार करावा

*शाकाहारी व्हा!!!*

तनाची ,मनाची अन् आत्म्याची
 पवित्रता वाढवा . पटलं तर बघा. ..नाही तर सोडून  द्या. ...
*राम कृष्ण हरि*
👏👏👏👏👏

*जनहितासाठी एक छोटासा प्रयत्न*
सदर लेख व्हॉट्सप वरून कॉपी पेस्ट केला   

💣💥बोध-दीपावली💥💣

*** *बोध-दीपावली* ***

आज धनत्रयोदशी, भारतीय संस्कृतीतील प्रमुख महोत्सव असलेल्या दीपावलीचा दुसरा दिवस. आजच्याच तिथीला देव-दानवांनी समुद्राचे मंथन केल्यामुळे, त्या रत्नाकरातून चौदा रत्ने लोककल्याणासाठी निर्माण झाली होती. म्हणून त्या चौदा रत्नांपैकी,  भगवान विष्णूंची पत्नी भगवती श्रीलक्ष्मी व भगवान विष्णूंचे अवतार भगवान श्रीधन्वंतरी यांची जयंती आज साजरी होत असते. उत्तर भारतात ही धनतेरस खूप मोठ्या प्रमाणावर साजरी होते.
आज भगवती लक्ष्मीमाता व धनाधिपती कुबेरांची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे. तसेच सप्त धान्यांचीही पूजा करतात, नवीन वस्त्र, धातू, दागिने, सोने अशा वैभवसूचक  गोष्टींची खरेदी देखील करतात. सायंकाळी प्रदोष समयी श्रीलक्ष्मी-कुबेर पूजन करून साळीच्या लाह्या व बत्तासे आणि धने-गुळाचा नैवेद्य अर्पण करून, धन-धान्य समृद्धी व्हावी म्हणून कृतज्ञतापूर्वक श्रीभगवंतांची प्रार्थना करायची असते.
आजच्या तिथीलाच सायंकाळी धर्मदेवता यमराजाच्या नावाने दक्षिणेकडे तोंड करून एक दीप अर्पण करायचा असतो. एरवी आपण वर्षभर कधीही दक्षिणेकडे वात करून दिवा लावत नाही. या दीपदानाने अकालमृत्यू, अपमृत्यूपासून सुटका होते असे म्हणतात.
भगवान विष्णूंच्या श्रीमद् भागवतातील चोवीस अवतारांमध्ये भगवान श्रीधन्वंतरींची गणना होते. दीर्घकाल आयुष्य व उत्तम आरोग्य टिकून राहावे म्हणून आज त्यांची देखील पूजा केली जाते.
आरोग्य हीच खरी संपत्ती असून तेच सुखी व आनंदी जीवनाचे द्योतक आहे; व तेच सर्वथा साध्य देखील ! म्हणूनच की काय, भगवती लक्ष्मी व श्रीधन्वंतरींचा जन्म एकाच वेळेला झाल्याची गोष्ट शास्त्रांमध्ये आलेली आहे. पण दुर्दैवाने लक्ष्मीच्या पाठीमागे लागून लोक पहिल्यांदा आपल्या शरीराचे व आरोग्याचेच वाटोळे करून घेतात. पैसे मिळवण्यात इतके गढून जातात की अत्यंत दुर्मिळ असणारा मनुष्यजन्म, हेलपाट्याच्या गाढवासारखा झापडे लावून तेच ते करण्यात वाया घालवतात. एवढे मर मर मरून कमावलेली संपत्ती देखील मग त्यांना सुखाने उपभोगताही येत नाही. मिळालेला पैसा औषधांवरच खर्च होऊन जातो. ना समाधान ना आरोग्य, ना सुख ना आनंद, फक्त कष्ट; अशा विवंचनेतच सर्व आयुष्य नष्ट होऊन जाते. मानवजातीचे हेच भविष्य बहुदा पूर्वीच्या द्रष्ट्या ऋषींनी आधीच ओळखून लक्ष्मी व धन्वंतरींची सांगड घातलेली असावी.
प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज एक मार्मिक गोष्ट सांगत असत. भगवती लक्ष्मीचे वाहन आहे घुबड. त्याला संस्कृतमध्ये उलूक म्हणतात. हिंदीत उल्लू म्हणतात. उल्लू म्हणजे बावळट देखील. जेव्हा ही लक्ष्मी एकटीच येते तेव्हा ती घुबडावर बसून येते व ज्याच्याकडे येते त्याला 'उल्लू' बनवून लगेच निघूनही जाते. पण ती जेव्हा भगवान विष्णूंसोबत येते तेव्हा ती गरुडावरून येते व त्यावेळी ती स्थिर देखील राहाते. भगवान श्री ज्ञानेश्वर माउली मुद्दाम म्हणतात की, *"मुकुंदीं स्थिरावली लक्ष्मी जैसी ।"* एरवी अत्यंत चंचल असणारी भगवती लक्ष्मी श्रीभगवंतांबरोबर आली की एकदम स्थिर राहते. म्हणून जो फक्त लक्ष्मीच्या मागे लागतो तो 'उल्लू'च बनतो. त्याला मग धन्वंतरींचाच आधार घ्यावा लागतो.
भगवान श्रीधन्वंतरी हे आयुर्वेदाचे दैवत मानले जातात. त्यांच्या एका हातात अमृतकुंभ असतो. हा सर्व औषधांचे प्रतीक आहे. 'औषध' हे भगवान विष्णूंचे एक नाम आहे. त्यांची "अमृत, भेषज, भिषक्, वैद्य" इत्यादी अनेक नामे विष्णुसहस्रनामामध्ये आलेली आहेत. या नामांमधून श्रीभगवंतांचेच करुणामय धन्वंतरीस्वरूप आणखी स्पष्ट होते. म्हणून भगवान धन्वंतरींचा हात न सोडता अर्थात् आरोग्य न बिघडवता, गरुडावरून श्रीभगवंतांबरोबर येणारी लक्ष्मी प्राप्त करण्यासाठीच आपण सतत प्रयत्न केला पाहिजे. अशी लक्ष्मी प्राप्त झाली तरच आयुष्य अमृतमय होते. अमृतासाठी पूर्वी जे समुद्रमंथन झाले, त्या गूढ प्रक्रियेचे हे विचारमंथनच आजच्या धनत्रयोदशीचे खरे रहस्य आहे ! हे जाणून जर धनत्रयोदशी साजरी झाली, तरच मग दीपावलीचा शाश्वत आनंद लाभेल !
*दीपावलीची सुरुवात वसुबारसेला गोपूजनाने होते. गायीच्या सर्वांगात, शेणात, मूत्रातही पावित्र्याचा, मांगल्याचा, आरोग्याचा, लक्ष्मीचा वास असतो. म्हणून तिचे महत्त्व आधी जाणून तिची सेवा करायची, मग धनत्रयोदशीला आरोग्यासह लक्ष्मी प्राप्त होते. त्यानंतरच नरकासुराचा वध श्रीभगवंत करतात. म्हणजे आपलाही नरकाचा संबंध संपतो. मग आपल्या आयुष्यातील पापरूपी नरकाची अर्थात् आपले दुर्गुण, व्यसने व वाईट सवयी यांची व आपली संगत सुटते. तीच नरकचतुर्दशी ! असा नरकासुकाचा वध झाल्यावरच मिळालेली स्वर्गीय संपत्ती संपूर्ण कुटुंबासह आपल्याला सुखाने व योग्य पद्धतीने उपभोगता येते. तेच लक्ष्मीपूजन होय ! यातून आपल्या आयुष्यात एक नूतन प्रकाश-पर्व सुरू होते, तोच दीपावली पाडवा होय. असा जेव्हा बोध-दीपोत्सव संपन्न होतो, तेव्हाच सर्वत्र, सर्व समाजात असूया व द्वेषरहित बंधुभाव, स्नेहभाव उत्पन्न होत असतो, म्हणून दीपावलीची सांगता ही भाऊबीजेने होते. हीच संतांना अभिप्रेत असणारी खरी बोध-दीपावली होय !*
आपल्या प्रचंड बुद्धिमान व ज्ञानी ऋषीमुनींनी या सर्व भूमिकांचा सांगोपांग विचार करूनच हा तेजाचा, प्रकाशाचा महोत्सव, दीपावली महोत्सव साजरा करण्यास सुरुवात केलेली आहे. आपण त्यांचे मर्म जाणून न घेता, भामट्या पुरोगामट्यांनी उगीचच पेटवलेल्या नसत्या वादविवादात व फालतू चर्चांमध्येच रमतो. हे आपलेच दुर्दैव नाही का?
आजच्या या पर्वावर आपण सर्वांनी असा निर्धार करू या की, आम्ही आमच्या प्रगल्भ संस्कृतीचा यथायोग्य मान ठेवू, ती जाणून घेऊन आपले आयुष्य खरे सुखी करू व अभिमानाने भारतीय वैदिक संस्कृतीचे पाईक म्हणून जगात मिरवू ! अशी अलौकिक बोध-जाणीव निर्माण होऊन कायमची स्थिर होणे, हीच खरी दीपावली आहे व अशाच बोध-दीपावलीच्या तुम्हां सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा !!
*लेखक - रोहन विजय उपळेकर*
*भ्रमणभाष - 8888904481*