Translate

Saturday, January 19, 2019

Jast read it जिवनात यशस्वी होण्यासाठी काय कराल?*



जिवनात यशस्वी होण्यासाठी काय कराल?*


👉🏽नकारात्मकता नकोच ?

स्वतःशी नकारात्मक गोष्टी बोलणे बंद करा. जेव्हा तुम्ही तुमच्या कारकिर्दीला नवीन दिशा देत असाल तेव्हा तुम्हाला प्रोत्साहन देणारे कदाचित कोणीही नसेल. अशात स्वतःबद्दल अनेक शंका यायला लागतात. तुमच्या नकारात्मक विचारांना तुमाच्यातूनच ताकद मिळते. तुम्ही त्यांच्यावर जेवढे जास्त फोकस करत तेवढेच ते प्रबळ होत जातील. तुमचे बहुतेक नकारात्मक विचार हे फक्त विचार आहेत, ते वस्तुस्थिती नाहीत. जेव्हा तुमचा तुमचे नकारात्मक विचार आणि निराशाजनक गोष्टींवर विश्वास बसू लागेल तेव्हा एक काम करा - तुम्ही ते विचार कुठेतरी लिहून ठेवा. तुम्ही जे काही करत असाल ते तिथेच थांबवा आणि विचार लिहून ठेवा. अशा प्रकारे तुमच्या निराशाजनक विचारांच्या वेगळा लगाम बसेल आणि तुम्ही गोष्टींना त्यांच्या प्रत्यक्ष रुपात जास्त तार्किक होऊन पाहू शकाल आणि वस्तुस्थिती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल.

👉🏽जर असे झाले तर काय?

स्वतःला "जर असे झाले तर काय?" विचारणे बंद करा. "जर असे झाले तर काय?" असे हायपोथेटिकल स्टेटमेंट आहे जे तुमची चिंता आणि ताण वाढवते, आणि ते तुमच्या प्रगतीच्या मार्गातील अडसर आहे. गोष्टी बिघडवायच्या असतील तर त्याचे शेकडो मार्ग आहेत, आणि तुम्ही त्या बिघडतील म्हणून विचार करत बसलात तर कृती कधी करणार? स्वतःला "जर असे झाले तर?" हे विचारणे तुम्हाला केवळ एकाच जागी घेऊन जाऊ शकते, जिथे तुम्हाला जायचे नाहीये, जाणे तुमची गरज नाहीये. पण तुमचे प्लान्स एकदम पक्के असले पाहिजेत. त्यांच्यात सर्व शक्यातांसाठी जागा असली पाहिजे. चिंतिती असल्यामुळे शोधत राहणे आणि भविष्य नजरेसमोर ठेऊन सर्व शक्यतांच्या दृष्टीने रणनीती आखण्याचे अंतर ओळखणे तुमाच्यासाठी आवश्यक आहे.

👉🏽व्यायाम आणि झोप

 आपला व्यायाम आणि झोप यांकडे लक्ष द्या .चांगल्या झोपेचे महत्त्व यावर मी यापेक्षा काही बोलू शकत नाही. जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुमचा मेंदू न्यूरॉन्स मधु ती हानिकारक तत्व काढतो जी जागृत अवस्थेत उपस्थित असतात. समस्या केवळ हीच आहे की मेंदू ही तत्व तेव्हाच काढू शकतो जेव्हा तुम्ही झोपता. जर तुमची झोप पूर्ण झाली नाही तर ही हानिकारक तत्व तुमच्या मेंदूत उपस्थित राहतील आणि तुमचे कार्य शिथिल करतील. या नुकसानाची भरपाई तुम्ही जागरणासाठी चहा कॉफी पिऊन देखील करू शकत नाही म्हणूनच भरपूर काम केल्यानंतर आपले शरीर आणि मेंदू यांना पूर्ण आराम द्या.
तुमचे आत्म-नियंत्रण, ध्यान आणि मेमरी आवश्यक झोप मिळाली नाही तर आणि शांत झोप मिळाली नाही तर कमी होते. झोप अपूर्ण झाली आणि कोणताही तणाव जाणवला नाही तरी देखील अनेक प्रकारची स्ट्रेस हार्मोन्स निघतात जे तुमची प्रोडक्टिविटी कमी करतात. कधी कधी असेही होऊ शकते की तुम्ही कामाच्या जोशात आपली झोप टाळू लागता, परंतु तसे करणे तुमच्या हिताचे नहीये.
Eastern Ontario Research Institute मध्ये झालेल्या एका संशोधनात असे लक्षात आले आहे की १० आठवड्या पर्यंत दिवशी दोन वेळा व्यायाम करणाऱ्या व्यक्ती अधिक सोशल, एकेडमिक आणि एथलेटिक असतात. ते आपल्या बॉडी इमेज च्या बाबतीत जागरूक असतात आणि त्यांच्या आत्मविश्वासाचा स्तर सुद्धा जास्त असतो. सर्वांत चांगली गोष्ट ही आहे की व्यायाम केल्यामुळे त्यांच्या शरीरात वाढणारे लाभदायक हार्मोन्स शरीराला तत्काळ सकारात्मक उर्जेने भरून टाकतात. तसेच शरीरात होणारे फिजिकल परिवर्तन देखील आत्मविश्वासाचा स्तर उंचावण्यात सहाय्यक असतात.
तुम्ही तुमच्या दिवसभराच्या कामांना सांभाळून व्यायाम अशा प्रकारे योजा की तो चुकू नये नाहीतर तुमचा संपूर्ण दिवस वाया जाईल.


No comments:

Post a Comment