Translate

Saturday, January 19, 2019

Keep secret your few things


*स्त्री असो किंवा पुरुष, या गोष्टी  नेहमी गुप्त  ठेवाव्यात*
--------------------------------------------------

आपण आपल्या महत्त्वाच्या खाजगी गोष्टी नेहमी गुप्त ठेवणे आवश्यक आहेत. या गोष्टी इतरांना समजल्या तर भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

*येथे जाणून घ्या अशा  गोष्टी, ज्या नेहमी गुप्तच ठेवाव्यात...*

*१)अपमान -*
जर एखाद्या कारणामुळे अपमानाला सामोरे जावे लागले तर ही गोष्टही गुप्त ठेवावी. इतरांना ही गोष्ट माहिती पडल्यास त्यांच्यासाठी आपण हास्याचा विषय बनू शकतो.

*२)धनहानी -*
साध्यःच्या काळात पैशाला कोणत्याही व्यक्तीच्या शक्तीचे कारण मानले जाते. बहुतांश परिस्थितीमध्ये पैशाच्या आधारावरच नाते निभावले जातात आणि मैत्री केली जाते. यामुळे जर कधी धनहानीचा सामना करावा लागला तर ही गोष्ट गुप्त ठेवावी. धनहानीची गोष्ट इतरांना सांगितली तर अनेक लोक तुमच्यापासून दूर जाऊ शकतात. धनहानी भरून काढण्यासाठी धनाची आवश्यकता असते आणि ही गोष्ट सर्वांना माहिती पडल्यास कोणीही आर्थिक मदत करणार नाही. तसेच तुमच्याजवळ भरपूर पैसा असेल तर ही गोष्टही गुप्तच ठेवावी.

*३)कुटुंबातील वाद -*
अनेक घरांमध्ये वाद होत असतात, ही एक सामान्य गोष्ट आहे. परंतु कौटुंबिक वादाची चर्चा घराबाहेर चुकूनही करू नये. असे केल्यास समाजात कुटुंबाची प्रतिष्ठा कमी होते. कुटुंबाबद्दल वाईट विचार करणारे लोक याचा फायदा घेऊ शकतात.

*४)मंत्र -*
गुरूने दिलेला मंत्र गुप्त ठेवावा. गुरुमंत्र गुप्त ठेवला तरच सिद्ध होतो. गुरुमंत्र गुप्त ठेवून उपासना केल्यास लवकर शुभफळ प्राप्त होते.

*५)दान -*
गुप्त दानाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. शास्त्रानुसार जे लोक गुप्तदान करतात त्यांना अक्षय पुण्याची तसेच देवी-देवतांची विशेष कृपा प्राप्त होते. इतरांना सांगून दान केल्यास पुण्य प्राप्त होत नाही.

*६)पद-प्रतिष्ठा -*
जर तुम्ही एखाद्या मोठा पदावर असाल आणि समाजात मान-सन्मान असेल तर ही गोष्टही गुप्त ठेवावी, एखाद्या अनोळखी व्यक्तीसमोर ही गोष्ट सांगितल्यास अहंकाराचा भाव निर्माण होतो. अहंकार पतनाचे कारण ठरते आणि यामुळे आपली प्रतिष्ठाही कमी होते.

*७)एकांत-*
स्त्री-पुरुषाने  एकांताकडे विशेष लक्ष द्यावे. या कर्माशी संबंधित गोष्टी नेहमी गुप्त ठेवाव्यात. या गोष्टी इतरांना समजल्यास, हे आपल्या चारित्र्य आणि सामाजिक जीवनासाठी योग्य ठरत नाही.
--------------------------------------------------
*संकलन :- सतीश अलोणी @*
Copy from whatsapp    🙏🙏
---------------------------------------------------

No comments:

Post a Comment