Translate

Friday, November 9, 2018

Top 18 Motivational Quotes

*मनापासून शांतपणे                    वाचा*                                                                      ★ जिथं आपली कदर नाही , तिथे कधीही जायचे नाही. ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो,त्यांची मनधरणी करत  बसायचे नाही. जे नजरेतून उतरले,त्यांच्या त्रास करून घायचा नाही.
   ★आपले हातून एखादयाचे काम होत असेल तर ते निस्वार्थी व निसंकोच करा. नेहमी मदत करा दुसर्याला त्रास होईल असे कदापी वागू नका.                                
     ★नेहमी स्वतः सोबत पैज लावा, जिंकलात तर  आत्मविश्वास' जिंकेल, आणि हरलात तर 'अहंकार' हरेल.

    ★पाण्याने भरलेल्या तलावात.मासे किड्यांना खातात, तर तोच तलाव कोरडा झाल्यास. किडे मास्यांना खातात..संधी सगळ्यांना मिळते.फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा...!
     ★ एखाद्या जवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्याच्याजवळ आपला विषय जरी निघाला तर.त्याच्या ओठांवर थोडंसं हसू आणि डोळ्यात थोडंसं पाणी नक्कीच आलं पाहिजे...!
        ★  तुम्ही स्वत:च्या खांद्यावर डोके टेकुन रडू शकत नाही आणि स्वत:च स्वत:ला आनंदाने मिठीही मारू शकत नाही...! आयुष्य म्हणजे दुस-यांसाठी जगायची बाब आहे...!      
             ★जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते आणि ते कोठे जमिनीवर नाहीं तर आपल्या मनात रुजवावे लागते..
     ★वादळे जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. वादळ महत्त्वाचे नसते. प्रश्न असतो कि आपण त्यांच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.      
         ★जगातील कुठलीच गोष्ट परिपुर्ण नाही.परमेश्वरानं सोनं निर्माण केलं. चाफ़्याची फ़ुलं सुद्धा त्यानंच निर्माण केली. मग त्याला सोन्याला चाफ़्याचा वास नसता का देता आला ? अपुर्णतेतही काही मजा आहेच की..
     ★दगडात मूर्ती असतेच. त्याचा फक्त नको असलेला भाग काढून टाकायचा असतो. आणि मग ह्याच भावनेने माणसाकडे पहा.  माणसातही नको असलेला भाग दूर करायला शिका.    
            ★जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक रहा. जेव्हा आर्थिक परिस्थती चांगली  असेल तेव्हा साधे रहा. जेव्हा एखादे पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील रहा. जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा शांत रहा.                      
      ★आपण हरवण्यासारखं आयुष्यात जरूर घडायला हवं , कारण अशा स्थळावरून परतताना माणूस 'माणूस' राहत नाही. परतून येतं ते चैतन्य!                  
        ★सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीचं सोनं करा.समुद्र हा सर्वांसाठीच सारखाच असतो . काहीजण त्यातून मोती काढतात तर काहीजण मासे काढतात तर काहीजण फक्त पाय ओले करतात.. हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे. फक्त तुम्ही त्यातून काय घेता हे महत्वाचे..
             ★तुम्ही कोणासाठी कितीही केले, तरी ते कोठेतरी कमीच पडते.​  ​कारण सत्य चप्पल घालून तयार होईपर्यंत , खोटं गावभर हिंडून आलेलं असतं.​
   
​    ★प्रेमळ माणसं तुम्हाला कधी वेदना देतीलही,​ पण त्यांचा उद्देश फक्त  तुमची
 काळजी घेणं हाच असतो.​

 ★जगातलं कटु सत्य हे आहे
की  "नाती" जपणाराच नेहमी सर्वांपासून दुरावला जातो​.
         
         ★नेहमी  लक्षात  ठेवा  की, 'मरण' कधीच  कुणालाच  चुकलेल नाही.आपल्या कडे असलेल्या संपत्तीचा बडेजाव करू नका. भरकटलेल्या जहाजात कितीही पैसा असला तरी पिण्याचे पाणी मिळत नाही. जमिनीशी जोडलेले राहा.
     ★ पदाचा, संपत्तीचा कधी गर्व करू नये. आयुष्य कितीही वैभवात काढले तरीही मयत त्याच मांजरपाट कपड्यात नेले जाते. *' कफन ब्रँडेड नही होता.'*


💥💣Copy from whatsapp 💥💣💥
                🙏🙏

No comments:

Post a Comment